भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसेंबाबत शरद पवारांचे मोठे विधान

भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसेंबाबत शरद पवारांचे मोठे विधान

एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे पवारांची भेट घेतली होती.

  • Share this:

औरंगाबाद,21 डिसेंबर: भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. एकनाथ खडसे हे मला भेटले होते. त्यांच्याशी माझी चर्चाही झाली. पण त्यांचे समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडे नाही,' असे सांगून शरद पवार यांनी खडसेंनाच धक्का दिला आहे. शरद पवार यांच्या विधानानंतर आता खडसे काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना त्याबाबत विचारला असता त्यांनी चर्चेतील हवाच काढून टाकली. खडसे हे मला भेटले होते. माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. मात्र, त्यांचे समाधान करण्याइतपत साधनसामुग्री माझ्याकडे नसल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, भाजपवर नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी परळी येथील गोपीनाथ गडावर झालेल्या जाहीर मेळाव्यात राज्यातील नेतृत्वावर तोफ डागली होती. पंकजांचे सांगत नाही पण माझा भरवसा नाही, असं सांगत खडसेंनी 'भाजप' सोडण्याचे संकेत दिले होते.

पंकजा मुंडे यांचा पराभव झाला नाही घडवला, खडसेंनी स्वकीयांवर घणाघात केला आहे. शेटजी, भटजींचा पक्ष म्हणून हिणवल्या जाणाऱ्या भाजपला बहुजनांचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. मुंडेच्या मतदारसंघात पंकजा पराभूत झाली हे दु:ख आहे. पंकजाला बोलता येत नाहीय ती वेदना सहन करतेय, असेही खडसेंनी यावेळी सांगितले. जुन्या नेत्यांनी पक्ष सोडून जावे, अशी नीती अवलंबली जात आहे. माझ्या समंतीशिवाय देवेंद्र पक्षाध्यक्ष झाले नसते. आधी माझं तिकीट कापलं गेलं. जास्त बोललं तर शिस्तभंग होईल, अशी धमकी देण्यात आली. एकनाथ खडसेंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक करत अजून किती दिवस सहन करायचं? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.

दरम्यान, सभेपूर्वी बोलताना आपण भाजपवर नाराज नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. "मी निवडणुकीत पहिल्यांदाच पराभूत झाले. म्हणूनच आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ मी भाजपवर नाराज आहे, असा नाही. पंकजा मुंडे भूकंप करणार. भूकंप ही काही चांगली बाब नाही. पण कुणाचीही हानी होणार नाही, असा भूकंप करण्याचा प्रयत्न मी करेन." असे संकेत माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आधीच दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2019 11:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading