शरद पवार भडकले, पक्ष सोडून गेलेल्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात जावून हल्लाबोल!

आज विकासाच्या नावाचा घोष करता पण एवढी वर्ष सर्व तुमच्या हातात दिलं होतं तेव्हा काय केलं? असा संताप त्यांनी व्यक्त केला. पवारांच्या या आक्रमक भाषणाला कार्यकर्त्यांनीही जोरदार दाद दिली.

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2019 07:40 PM IST

शरद पवार भडकले, पक्ष सोडून गेलेल्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात जावून हल्लाबोल!

बालाजी निरफळ, उस्मानाबाद 17 सप्टेंबर : दिग्गज नेते पक्ष सोडून जात असल्याने राष्ट्रवादीला मोठी गळती लागलीय. ही गळती रोखणं आणि कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण करण्यासाठी आता खुद्द शरद पवारच मैदानात उतरले आहेत. पवार राज्यव्यापी दौऱ्यावर असून जे नेते सोडून गेले त्यांच्या बालेकिल्ल्यात जावून त्यांनी पलटवार केलाय. पवार आज उस्मानाबादमध्ये होते. तिथे त्यांनी पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांना नाव न घेता फैलावर घेतलं. आज विकासाच्या नावाचा घोष करता पण एवढी वर्ष सर्व तुमच्या हातात दिलं होतं तेव्हा काय केलं? असा संताप त्यांनी व्यक्त केला. पवारांच्या या आक्रमक भाषणाला कार्यकर्त्यांनीही जोरदार दाद दिली.

भाजपप्रवेश लांबला कारण... नारायण राणेंनी केला मोठा खुलासा

पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील हे शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जात होते. गेली अनेक दशकं त्यांनी पवारांना पूर्ण समर्थन दिलं. मात्र काही दिवसांपूर्वीच राणाजगजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे पवार यांनी थेट उस्मानाबादला येवूनच त्यांना फैलावर घेतलं. ते म्हणाले, विकास करण्यासाठी भाजपात गेलात तर इतक्या दिवस काय काय करत होतात असा प्रश्न उपस्थित करताना पवार यांनी असे हातवारे केले की की कार्यकर्त्यांनी सभागृह टाळ्या आणि शिट्ट्यांनी दणाणून सोडलं.

कायम सभ्य आणि शालीन शब्दात फटकारणाऱ्या पवारांनी यावेळी मात्र भाषणात अनेकदा अतिशय शेलक्या शब्दांचा आणि ग्रामीण भाषेचा वापर करत आपला संताप व्यक्त केला. आता नवीन लोकांना उभं करणार, नव्या तरुणांच्या हातात नेतृत्व देणार असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसचं 'डिझास्टर मॅनेजमेंट'; या दिग्गज नेत्यांना विधानसभा लढण्याचे आदेश!

Loading...

उस्मानाबादमध्ये फुलणार का कमळ?

उस्मानाबाद जिल्ह्यांतल्या 4 मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात भाजपला विजय मिळाला नव्हता. पण आता मात्र भाजपने इथे संघटनात्मक ताकद वाढवली आहे. त्यामुळे भाजपला इथे चांगलं यश मिळू शकतं.

उस्नानाबाद मतदारसंघात 2014 मध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला.

आता राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे उस्मानाबादमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. इतकी वर्षं स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीकडे होत्या. पण आता मात्र समीकरणं बदलली आहेत. युती झाली तर ती जागा भाजपला मिळू शकते.

परांडा मतदारसंघात सलग तीन वेळा राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांनी विजय मिळवला. त्यामुळे तेच इथे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. शिवसेनेकडून जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी तयारी चालवली आहे. गेल्या 2 वर्षांत त्यांनी इथे संघटनात्मक ताकद वाढवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...