...तर भाजपला सत्तेवरून हाकलायला वेळ लागणार नाही - शरद पवार

'जाताना नेते म्हणतात पवार माझ्या ह्रदयात आहेत. मी जर तुमच्या ह्रदयात आहो तर मग पक्ष का सोडून जात आहात.'

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 04:17 PM IST

...तर भाजपला सत्तेवरून हाकलायला वेळ लागणार नाही - शरद पवार

विजय कमळे पाटील, जालना 20 सप्टेंबर :  महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना फैलावर घ्यायला सुरुवात केलीय. जे नेते सोडून गेले त्यांच्याच गावात जावून पवार कार्यकर्त्यांना भेटत आहे. 15-20 वर्ष जे पवारांसोबत होते असं निष्ठावान समजले जाणारे अनेक नेते भाजप किंवा शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला प्रचंड मोठं खिंडार पडलंय. ही पडझड रोखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी शरद पवार राज्यांच्या झंझावती दौऱ्यावर आहेत. आज जालन्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी पक्ष सोडणाऱ्या चांगलाच दम भरला.

पवार म्हणाले, पक्ष बदलणारे म्हणताय विकास करायचा म्हणून तिकडे चाललो, मग 15-15 वर्ष मंत्रिपद असून काय केलं. विकासाच्या नावावर पक्ष सोडणाऱ्यांनो थोडे दिवस थांबा, तुम्ही आणि मी आहोत. फक्त बटन दाबायची वेळ येऊ द्या, मग यांचा विकास कुठे पाठवायचा ते आपण ठरवू. कुठे पळापळ झाली तरी जालन्यातील राष्ट्रवादीचा कोणीही कुठे जाणार नाही याचा मला विश्वास आहे. असं त्यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस लातूरचा बालेकिल्ला राखणार? पाहा SPECIAL REPORT

जाताना नेते म्हणतात पवार माझ्या ह्रदयात आहेत. मी जर तुमच्या ह्रदयात आहो तर मग पक्ष का सोडून जात आहात असा सवाल त्यांनी केला. पवार यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, शहा उद्योगपतींचं कर्ज माफ करताहेत पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही अशी त्यांची भूमिका आहे. ज्या शेतकऱ्यांच्या भरवशावर अन्न-पाणी मिळते त्याच शेतकऱ्यांना हे लोक विसरतात. तुम्ही आम्ही एकदा ठरवलं तर भाजपला सत्तेवरून हाकलायला वेळ लागणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे, लवकरच कळवू- उद्धव ठाकरे

Loading...

राज्यात भाजपमध्ये सुरू असलेल्या मेगा भरतीदरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र आज शरद पवार यांच्या उपस्थितीतच राजेश टोपे यांनी शिवसेना प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. 'मी राष्ट्रवादीतच राहणार आहे,' असा खुलासा त्यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2019 04:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...