...तर बाळासाहेबांनी शिवसेना नेत्यांना फटके मारले असते, शरद पवारांचं वक्तव्य

...तर बाळासाहेबांनी शिवसेना नेत्यांना फटके मारले असते, शरद पवारांचं वक्तव्य

शरद पवारांच्या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

  • Share this:

औरंगाबाद,20 डिसेंबर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चक्क शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि औरंगाबादचे महापौर नंदू घोडीले यांच्यासमोर एक विधान केले आहे. शरद पवार म्हणाले, बाळासाहेब आज जिवंत असते तर शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी फटके मारले असते. शरद पवारांच्या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मराठवाड्याचे वैद्यकीय व तंत्रशिक्षणाची पायाभरणी करणारे सेवाव्रती महात्मा गांधी मिशन या संस्थेचे सचिव व एमजीएम विद्यापिठाचे कुलपती अंकुशराव उर्फ बाबुराव कदम यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार समारंभात शरद पवार बोलत होते. शरद पवार यांनी आपल्या भाषणात औरंगाबाद येथील होऊ घातलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा उल्लेख केला. या स्मारकासाठी महापालिकेच्या वतीने प्रियदर्शिनी गार्डनमधील जवळपास 500 झाडे तोडण्यात आली. महापाकिकेत सध्या शिवसेनेचा महापौर आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उद्यान होणार आहे, ते बाळासाहेब जिवंत असते आणि त्यांच्यासाठी झाडे तोडली असती तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना फटके मारले असते, असे शरद पवार म्हणाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील होते. माजी मंत्री व एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती दिली. तसेच या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याच्या निमित्ताने कदम यांच्या जीवनावर आधारीत 'शिल्पकार' या गौरवग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या करण्यात आले. प्रा.डॉ.अशोक नाईकवाडे व प्रा. डॉ. रेखा शेळके यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. कदम यांच्याशी संबंधीत राज्यातील अनेक मान्यवरांचे लेख या गौरव ग्रंथामध्ये समाविष्ट असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2019 02:14 PM IST

ताज्या बातम्या