'समुद्रात नाव बुडताना उंदीर उडी मारतात तशी 'राष्ट्रवादी'ची स्थिती'

'ज्यांच्या भानगडी आहेत, ज्यांचे घोटाळे आहेत, त्यांचे घोंगडे अडकले आहे. त्यावर पांघरून घालण्याकरताच नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.'

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2019 05:27 PM IST

'समुद्रात नाव बुडताना उंदीर उडी मारतात तशी 'राष्ट्रवादी'ची स्थिती'

सुरेश जाधव, बीड 1 सप्टेंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी रांग लागलीय. नेत्यांच्या या पक्षांतरावर  ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी सडकून टीका केलीय. ते म्हणाले, ज्यांच्या भानगडी आहेत, ज्यांचे घोटाळे आहेत, त्यांचे घोंगडे अडकले आहे. त्यावर पांघरून घालण्याकरताच नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत अशी टीका त्यांनी केलीय. भाजपाच्या गंगेत डुबकी मारून पवित्र होऊ असा या नेत्यांचा समज आहे. मात्र ती गंगाच मलिन झालेली आहे. अशी टीकाही आडम यांनी केलीय. समुद्रात नाव बुडताना उंदीर उडी मारतात तशी गत राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

सुरेश जैन यांनी मंत्री झाल्यावर केला होता 'घरकुल घोटाळा' दडपण्याचा प्रयत्न

कम्युनिस्ट पक्षाच्या बीड जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते कॉ.अशोक ढवळे, सीपीएमचे कॉ.उत्तम माने कॉ.पी.एस घाडगे, शेकापचे भाई मोहन गुंड, इत्यादी नेते उपस्थित होते. आडम पुढे म्हणाले, देशात आर्थिक बेरोजगारी आणि बेकारी वाढत आहे, कामगारांवर उपासमारीची वेळ येतेय, देशात 34 कोटी लोकांना फक्त एकाच वेळचं जेवणं मिळतं. पारले बिस्कीट कंपनी मधील कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली, शस्त्राअस्त्र बनवणाऱ्या कंपनी मधील कामगार कमी केली जात आहेत.

VIDEO: 'आघाडीची हवा संपली हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही'

सरकारशी भांडून रक्त सांडून कामगारांसाठी कायदे केले गेले मात्र आज त्याच कायद्याची पायमल्ली होत आहे. खचून न जाता देशाच्या एकूण परिस्थितीला बदलण्यासाठी व्यवस्थे विरोधात बंड पुकारण्यासाठी, दोन हात करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असं आवाहनही त्यांनी केलं.

Loading...

राजे शिवसेनेच्याही संपर्कात

सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. पण त्याचवेळी उदयनराजे यांच्याबाबतच्या नव्या चर्चांनी राष्ट्रवादीसह भाजपचीही डोकेदुखी वाढली आहे. कारण उदयनराजे भोसले हे शिवसेनेच्याही संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

VIDEO: राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटला

उदयनराजे भोसले यांची नुकतीच युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासोबत महत्वाची बैठक झाली. त्यामुळे उदयनराजे शिवसेनेच्याही संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. वरुण सरदेसाई यांनी या भेटीचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं आहे. मात्र तोंडावर आलेली विधानसभा निवडणूक आणि पक्षबदलासाठी उदयनराजेंच्या सुरू असलेल्या हालचाली, यामुळे ते शिवसेनेच्याही संपर्कात आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BJPNCP
First Published: Sep 1, 2019 05:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...