पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसरीचा गळा आवळून खून... मुलीच्याही हत्येचा प्रयत्न

पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसरीचा गळा आवळून खून... मुलीच्याही हत्येचा प्रयत्न

एका दादल्याने पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

जालना, 13 सप्टेंबर: एका दादल्याने पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याची पहिली पत्नी व मुलाला अटक केली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पूजा अमोल पाठक (25) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. शहरातील यशोदीप नगरात शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. आरोपी पाठक मंगल कार्यालयाचा मालक आहे.

मुलीचाही खून करण्याच प्रयत्न..

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी अमोल वसंत पाठकसह त्याची पहिली पत्नी वैशाली पाठक व मुलगा उज्ज्वल पाठक या तिघांना अटक करण्यात आली आहे. अमोल पाठक याने दुसरी पत्नी पूजा अमोल पाठक (25) हिचा गुरुवारी गळा आवळून खून केला. तसेच, पूजाची मुलगी सिद्धी हिचाही गळा दाबण्यात आला होता. मात्र, ती थोडक्यात बचावली. हा प्रकार रात्री उशिरा लक्षात आल्यानंतर मृत पूजाची आई लताबाई मेहरा यांनी पोलिसांत तक्रार दिली.

डीव्हीआर गायब...पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न..

आरोपी अमोल पाठक याने पत्नीची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. घटनास्थळचे सीसीटीव्ही फुटेज मिळू नये म्हणून आरोपीने डीव्हीआर (DVR) गायब केला आहे. या कामात आरोपीला पहिली पत्नी वैशाली आणि मुलगा उज्ज्वल याने मदत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

VIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मारहाण

Published by: Sandip Parolekar
First published: September 13, 2019, 2:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading