मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बीड: कोरोनाच्या नावाखाली आरोग्य यंत्रणेकडून 59 कोटींचा खर्च, घोटाळ्यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

बीड: कोरोनाच्या नावाखाली आरोग्य यंत्रणेकडून 59 कोटींचा खर्च, घोटाळ्यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

कोरोनाच्या नावाखाली बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडून (Health System) अव्वाच्या सव्वा बिल लावून कोट्यावधी रुपये शासनाकडून उकळले (Scam In Beed) जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यात 59 कोटी रुपये खर्च झाले कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुढे वाचा ...

बीड 12 मार्च : कोरोनाच्या नावाखाली बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडून (Health System) अव्वाच्या सव्वा बिल लावून कोट्यावधी रुपये शासनाकडून उकळले (Scam In Beed) जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली आहे. महामारीच्या संकटासोबत संपूर्ण देश लढा देत असताना काही अधिकाऱ्यांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेत शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप गणेश ढवळे यांनी केला आहे. यासंबंधीचे कागदपत्रदेखील त्यांनी माध्यमांसमोर सादर केली आहेत. बीड आरोग्य यंत्रणेकडून रुग्णालयातील अद्यायावत इमारतीची दुरुस्ती आणि विद्युतीकरण यावर कोट्यवधीचा खर्च केल्याचं समोर आला आहे. तसंच मास्क, सॅनिटायझर, बेड ,पडदे, सीसीटीव्ही कॅमेरे ऑक्सिजन निर्मिती प्लांट यामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे चक्क पाच कोटी रुपयाचे सॅनिटायझर वापरलं गेल्यानं एकच आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

कोरोना आपत्तीच्या काळात काही आरोग्य सेवकांनी देवदूत म्हणून काम केलं. कोरोना योद्धे म्हणून त्यांचं काम तेवढंच महत्वाचं आहे, तर काही अधिकाऱ्यांनी स्वतःचं उखळ पांढरं करून घेण्यातच धन्यता मानली. यात एकीकडे उपचाराअभावी व साहित्याअभावी निष्पाप लोकांचे कोरोनामुळे बळी जात असताना दुसरीकडे मात्र गरज नसताना इमारतीच्या दुरुस्तीवर कोट्यवधीचा खर्च केल्याचं समोर आलं आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाच्या कालावधीमध्ये तब्बल 59 कोटी रुपये खर्च केल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे.

केंद्र सरकारकडून व्हेंटिलेटर, रेमडीसिव्हर आणि उपकरणे दिली गेली तसंच मनुष्यबळाचा खर्च राज्य शासनाच्या तिजोरीतून केला गेला. औषधांसाठीदेखील राज्य शासनानं मदत केली, मात्र तरीदेखील जिल्ह्यात 59 कोटी रुपये खर्च झाले कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर शासनाकडे हस्तांतरित न केलेल्या इमारतीची दुरुस्ती करण्यावरदेखील उधळपट्टी केल्याचं समोर आलं आहे. तसंच गरज नसताना विद्युतीकरणावर सात ते आठ कोटी रुपये खर्च केला आहे. हे फक्त सत्ताधारी पक्षातील गुत्तेदार यांचे संबंध जपण्यासाठीच केलं गेल्याचा आरोपदेखील डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.

आपत्तीच्या काळात जिल्हा आरोग्य यंत्रणेनं खरेदी केलेली वैद्यकीय उपकरणे व साहित्य याचे बाजार मूल्यदेखील आजच्या बाजार मूल्यापेक्षा दुप्पट आहे. त्यात मास्क सॅनिटायझर व इतर साधने आहेत. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी काय केलं हे मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी फोनवरून दिली. या प्रकरणाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनादेखील संपर्क केला मात्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहे.

First published:

Tags: Corona