• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • अतिआरक्षणामुळे गुणवत्तेची हत्या थांबवा.. बीडमध्ये विद्यार्थी-पालक रस्त्यावर

अतिआरक्षणामुळे गुणवत्तेची हत्या थांबवा.. बीडमध्ये विद्यार्थी-पालक रस्त्यावर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे सांगितले असताना त्यांच्या विचारांची पायमल्ली होत आहे.

  • Share this:
बीड, 31 ऑगस्ट:अतिआरक्षणामुळे गुणवत्तेची हत्या होत आहे. गुणवत्ता वाचली तर देश वाचेल, यासाठी 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'चा नारा देत बीडमध्ये विद्यार्थी-पालक रस्त्यावर उतरले. जिल्हाअधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. हजारोच्या संख्येने महिला, मुली, विद्यार्थी, पालक, वयोवृद्ध अशा तीन पिढ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला. अत्याधिक आरक्षणाचा धोका ओळखून सरकारने आरक्षणाचा फेरविचार करावा, असेच खुल्या प्रवर्गातिल घूसखोरी थांबवावी तसेच कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा लाभ दिला जावू नये, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चातून आरक्षण विरोधी रोष दिसून आला. मुलींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'च्या घोषणांनी बीड शहरातील जिल्हा अधिकारी कार्यालय परिसर दणाणून निघाला. देशात आरक्षणाची टक्केवारी 78 टक्क्यांपर्यंत गेली आहे. त्यामुळे खुल्यावर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे सांगितले असताना त्यांच्या विचारांची पायमल्ली होत आहे. 78 टक्के वगळून ज्या जागा उरतात त्यावर देखील आरक्षणातील विद्यार्थी दावा करतात, हे अन्यायकारक आहे. याविरोधात राज्यभर 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' ही चळवळ उभी राहिली आहे. बीडमधील डॉ.आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो लोक रस्त्यावर उरतले होते. दोन वर्षांच्या चिमुरडीपासून, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, पुरुष, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक अशा सर्व स्तरातील नागरिक या मूक मोर्चात सहभागी झाले. अत्यंत शिस्तीत आणि शांततेत चार किलोमीटर मुकमोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भरधाव ट्रकची बसला धडक, भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO समोर
Published by:Sandip Parolekar
First published: