भाजप करतेय महापुरुषांच्या नावाचा गैरवापर.. अण्णाभाऊ साठे यांच्या नातवाचा आरोप

भाजप करतेय महापुरुषांच्या नावाचा गैरवापर.. अण्णाभाऊ साठे यांच्या नातवाचा आरोप

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीसाठी घोषणा केलेल्या 100 कोटी पैकी 100 रुपये देखील मिळाले नाहीत.

  • Share this:

बीड, 22 ऑगस्ट- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीसाठी घोषणा केलेल्या 100 कोटी पैकी 100 रुपये देखील मिळाले नाहीत. मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोळ्याभाबड्या मातंग समाजाची निव्वळ फसवणूक केली आहे. भाजप सत्तेत आल्यापासून महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करुन मतांचं राजकारण करत आहे, असा आरोप अण्णाभाऊ साठे याचे नातू आणि मानवहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे.

मुख्यंमंत्र्यांनी मातंग समाजाला गृहीत धरण्याचं काम केलं. सत्तेतील वाटा दिलाच नाही. ज्या पक्षाने फसवणूक केली, त्यांना येत्या निवडणुकीत जागा दाखवून देऊ, असा इशारा अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे यांनी दिला आहे. बीडमध्ये सचिन साठे यांनी सांगितले की, सरकारने अण्णा भाऊच्या नावाने 1 ऑगस्टला टपाल तिकीटाची घोषणा केली. पण, अद्याप तिकीट पोस्टात पाहायला मिळले नाही. अण्णाभाऊच्या जन्मशताब्दीसाठी 100 कोटींची सरकारने घोषणा केली. मात्र, ते काम कसे आणि कोण करत आहे, याचा अद्याप पत्ता लागला नाही. अण्णाभाऊंच्या जन्मगावी 100 कोटींमधील शंभर रुपये देखील अद्याप मिळाले नाहीत. मोठमोठ्या घोषणा करुन ही फसवणूक निवडणूक तोंडावर ठेऊन केली जातेय. महामंडळाच्या अध्यक्ष नियुक्तीमध्ये राजकारण डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आली. मुख्यंमत्री भोळ्याभाबड्या मातंग समाजाची निव्वळ फसवणूक करत आहेत. त्या विरोधात मी संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती अभियान राबवत आहे. या फसवणुकीत विरोधात येत्या निवडणुकीत नक्कीच बदला घेऊ, असा इशारा सचिन भाऊ साठे यांनी दिला आहे.

मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2019 02:50 PM IST

ताज्या बातम्या