'मोहन भागवत वादग्रस्त वक्तव्य करून सामजिक स्वास्थ बिघडवतात'

'मोहन भागवत वादग्रस्त वक्तव्य करून सामजिक स्वास्थ बिघडवतात'

विशेष म्हणजे नागरिकता विधेयकाच्या विरोधात देशात पडसाद उमटत आहेत.

  • Share this:

बीड,19 डिसेंबर: राष्ट्रीस स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांचा अंबाजोगाईत होणारा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोयर्स सोशल फोरमने केली आहे. या संदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

मोहन भागवत हे कायम वादग्रस्त वक्तव्य करून सामजिक स्वास्थ बिघडवणारे भाषण करतात. त्यामुळे त्यांचा अंबाजोगाई शहरात होणारा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोयर्स सोशल फोरमच्या वतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नागरिकता विधेयकाच्या विरोधात देशात पडसाद उमटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होत आहे.

अंबाजोगाई शहरात डॉ. शरदराव हेबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 29 आणि 30 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होत आहे. डॉ. हेबाळकर हे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्यवाह आणि संघ प्रणित इतिहास संकलन समितीचे ते केंद्रीय सदस्य आहेत. त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे कार्यक्रमाला येणार असल्याने हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोयर्स सोशल फोरमच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देत कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीत मोहन भागवत यांच्या भाषणामुळे अंबेजोगाई शहरात सामजिक सलोखा आणी जातीय तडे निर्माण होवू शकते, असे निवेदन अॅड. विकास लोखंडे यांनी दिले आहे. यामुळे या कार्यक्रमाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. या बाबतीत प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) देशभरात आंदोलन पेटलं आहे. या आंदोलनांमुळे राजधानी ठप्प झाली, लखनौत आंदोलनाला हिंसक वळण लागलं. मुंबईत तुलनेनं शांततेत निदर्शनं झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2019 06:32 PM IST

ताज्या बातम्या