ऐन दिवाळीत पावसाने शेतकऱ्यांना रडवलं.. हातातोंडाशी आलेला घास हिसकावला

एकीकडे दिवाळी साजरी केली जात असताना या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची 'होळी' केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2019 06:58 PM IST

ऐन दिवाळीत पावसाने शेतकऱ्यांना रडवलं.. हातातोंडाशी आलेला घास हिसकावला

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,30 ऑक्टोबर: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. शेतातील काढणीला आलेले सोयाबीन, कापूस, बाजरी मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळे सोयाबीन जाग्यावर उगवून आली तर मक्याच्या कणसाला पालवी फुटली आहे. कापसाच्या पूर्णपणे 'वाती' झाल्या आहेत. एकीकडे दिवाळी साजरी केली जात असताना या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नाची 'होळी' केली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने तात्काळ मदत दिली तर शेतकऱ्यांला आधार मिळू शकतो.

मागील आठ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने दाणादाण उडाली आहे. बीड तालुक्यातील बाळापूर गावातील उषा लोखंडे याच्या शेतातील पाच एकर सोयाबीन काढून ठेवला, मात्र पावसाने मळणी करता आले नाही. त्यात पावसाने उघडीक न दिल्याने काढून ठेवलेल्या सोयाबीन वापून आली. ही सोयाबीन विकून दिवाळीचा आनंद घेण्याची त्यांचे स्वप्न मातीमोल झाले.

अशीच काही परिस्थिती अण्णा लोखंडे यांची आहे. मुलीचे लग्न केले. सोयाबीनच्या पिकावर राहिलेली देणी देता येईल, दिवाळी साजरी करता येईल, असे त्यांना वाटत होते. पण परतीच्या पावसाने त्यांना अडचणीत आणले आहे. सोयाबीन काढून ठेवली ती देखील काळी पडली आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावला आहे, अशीच भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणी केलेले पीक जोमात होती. मक्याला चांगली कणसे लागलेली होती. मात्र खळ्यासाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांवर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून पावसाने सुरुवात केल्याने मका जाग्यावर पडली जी मका 40 ते 50 पोते मका होते. मात्र, या वर्षी पावसाने काहीच पदरात पडले नाही. उलट जनावरांना टाकायचा चारा देखील काळा पडला. यामुळे केलेला खर्च निघाला नाही तर दिवाळी साजरी करावी कशी? असा प्रश्न युवा शेतकरी प्रवीण जाधव याने व्यक्त केला.

Loading...

परतीच्या पावसाने मुक्काम वाढवल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग कापूस मका या पिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असल्याचे चित्र आहे. लवकर खळे करून यंदाची दिवाळी गोड करावी, या आशेने शेतकऱ्यांने केलेल्या नियोजनावर पावसाने पाणी फिरले आहे. उभ्या सोयाबीनला कर फुटत आहेत. शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली असून प्रचंड प्रमाणात सोयीबनचे नुकसान झाले आहे.

VIDEO:'जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका', भाजप खासदाराचा शिवसेनेला अल्टीमेटम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 06:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...