क्वारंटाइन होण्यास नकार, माजी झेडपी अध्यक्षासह कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

क्वारंटाइन होण्यास नकार, माजी झेडपी अध्यक्षासह कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

क्वारंटाइन होण्यास नकार, माजी झेडपी अध्यक्षासह कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

  • Share this:

कन्हैया खंडेलवाल (प्रतिनिधी),

हिंगोली, 22 जुलै: राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे शहरापाठोपाठ आता कोरोनाचं संकट ग्रामीण भागात जास्त गडद होत आहे. मात्र, तरीही काही लोक कोरोनाला गांभीर्यानं घेत नसल्याचं चित्र दिसत आहे.

कोरोनाबाधित व्यक्तीचा संपर्कात असल्यामुळे आरोग्य तपासणी करून विलगिकरण कक्षात जाण्यासाठी सूचना करूनही घरीच बसून राहिल्याबद्दल हिंगोलीच्या माजी झेडपी अध्यक्षासह कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सेनगाव पोलिसांनी दाखल केला आहे.

हेही वाचा...कोरोनाचा धोका : बकरी ईदला बंद राहणार मक्कातील ग्रँड मशीद; हजसाठी अशी होतेय तयारी

सेनगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी शैलेंद्र फडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात असल्यामुळे तालुका कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टीमने हिंगोलीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोजनी खाडे, त्यांचे पती कुंडलिक नथुजी खाडे, मुलगा सतीश आणि सून मिरा खाडे यांना आरोग्य तपासणी करून विलगिकरण कक्षात जाण्यासाठी सूचना केल्या होत्या. परंतु शासकीय आदेश न पाळता हे सर्व आरोपी दिनांक 17 जुलै ते 22 जुलै 2020 चे दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्या घरीच राहिले. तसेच त्यांनी क्वारंटईन होण्यास नकार दिला. त्यामुळे माजी झेडपी अध्यक्षा सरोजनी खाडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील वरील आरोपींवर भादंवी कलम 188, 270, 34 आणि साथरोग प्रतिबंधक कायदा कलम 4 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

राज्यात पहिल्यांदाच दिवसभरात वाढले 10 हजारांवर रुग्ण...

राज्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक व्हायच्या मार्गावर आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 10576 कोरोनारुग्णांचं निदान झालं. 24 तासांत पाच आकडी नवे रुग्ण सापडण्याचा हा पहिलाच दिवस आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 337607 3 लाख 37 हजार 607 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 12,556 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले तब्बल 1,36,980 रुग्ण आहेत.

हेही वाचा... सख्ख्या भावांनीच केला बहिणीचा खून, मृतदेहाचे केले तुकडे; धक्कादायक कारण आलं समोर

एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. गेल्या 24 तासांत 10576 नव्या Covid रुग्णांचं निदान झालं आहे, तर 280 जणांना मृत्यू नोंदवण्यात आला आहे. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 5552 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली.

Published by: Sandip Parolekar
First published: July 22, 2020, 8:25 PM IST

ताज्या बातम्या