काँग्रेसचा हा बंडखोर नेता करणार मुख्यमंत्र्यांच्या यात्रेचं दणक्यात स्वागत!

मुख्यमंत्र्यांची यात्रा थेट त्यांच्याच गावात येत असल्याने त्यांनी यात्रेच्या दण्यात स्वागताची जोरदार तयारी केलीय. तर काँग्रेसच्या गोटात चिंता पसरलीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 04:16 PM IST

काँग्रेसचा हा बंडखोर नेता करणार मुख्यमंत्र्यांच्या यात्रेचं दणक्यात स्वागत!

सिध्दार्थ गोदाम, औरंगाबाद 26 ऑगस्ट : मराठवाड्यात असलेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा बुधवारी औरंगाबाद जवळच्या सिल्लोड इथं येणार आहे. सिल्लोड हा काँग्रेसचे माजी आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांचा गढ आहे. काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला राम राम केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जवळीकही साधली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपलं वजन युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्या पारड्यात टाकलं होतं. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्र्यांशी जवळीक काही लपून राहिली नाही. आता मुख्यमंत्र्यांची यात्रा थेट त्यांच्याच गावात येत असल्याने त्यांनी यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी केलीय.

मात्र सत्तार यांचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणांवरून भांडण झाल्याने काही काळ तणावही निर्माण झाला होता. स्टेज लावण्यावरून सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि घोषणाबाजी करण्यात आली. अब्दुल सत्तार यांनीही मुख्यमंत्रीच्या स्वागताची जंगी तयारी केलीय. शहरातील मुख्य चौकात भाजपच्या कार्यकर्त्यानी स्टेज ची परवानगी घेतली मात्र सत्तार यांच्या कार्यकर्त्यानी दादागिरी करून स्टेज त्या ठिकाणी टाकला असा आरोप भाजप ने केला. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही समर्थकांना तिथून दूर जायला भाग पाडला आणि परिस्थिती निवळली.

...म्हणून अमिताभ आहेत महानायक; मुख्यमंत्र्यांनी बिग बी यांचं केलं कौतुक

सत्तार हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक होते. नंतर काँग्रेसने त्यांना दिलेलं आश्वासनच न पाळल्याने ते नाराज होते. त्यात काँग्रेसची सारखी पडझड होत असल्याने पक्षाती स्थिती भविष्यात फार काही चांगली राहणार नाही याचा अंदाज त्यांना आला होता त्यामुळे सत्तार यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्रीपदावरच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंची गुगली

Loading...

राज्यातल्या विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. नेत्यांच्या यात्रा आणि सभांनी त्यात रंग भरलाय तर पक्षांतराने अनेकांना धक्के बसताहेत. भाजप आणि शिवसेनेचं चांगलंच जमलं असून आता जागावाटपाबद्दल चर्चा सुरू झालीय. कुणाला कुठल्या जागा याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. तर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना जोरदार प्रोजेक्ट करत असल्याने ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी चर्चा आहे. यावर जेव्हा आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं त्यावरून सस्पेन्स आणखीच वाढला आहे. याविषयीचा पेपर मी आत्ताच फोडणार नाही. जनता देईल ती जबाबदारी घेणार असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

राम शिंदे हे बॅनर मंत्री, रोहित पवारांची झणझणीत टीका

आदित्य यांनी जेव्हा जनआशीर्वाद यात्रा सुरू केली तेव्हा खासदार संजय राऊत यांनी आदित्य यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजक्ट केलं होतं. नंतर आदित्य यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याचीही चर्चा होती. त्यावर उत्तर देत आदित्य यांनी सस्पेन्स वाढवल्याने चर्चेला आणखी बळ मिळणार आहे. भाजप आणि शिवसेनेतल्या जागावाटपाच्या चर्चेवरही आदित्य यांनी उत्तर देत भूमिका स्पष्ट केली.

सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची सर्वांत मोठी मोहीम मुंबईत सुरू होणार

ते म्हणाले, युतीबद्दल मी बोलणार नाही. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात युती बद्दल चर्चा झाली आहे. तेच या बद्दल बोलतील. मी त्यांच्या समोर खूप लहान आहे. म्हणून युतीबद्दल मी बोलणार नाही. आम्ही पक्ष किंवा सरकार म्हणून नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. कर्जमाफी उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारामुळे झाली, मात्र आमचा उद्दिष्ट कर्जमुक्ती आहे. पीक विमा योजनेसाठीही आम्ही लढत आहोत. सरकारने जी कर्जमाफी केली, त्यात अनेक त्रुटी आहेत, त्या दूर झाल्या पाहिजे. जिथे सरकार करणार नाही तिथे आम्ही आंदोलन करू असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 04:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...