शिवसेनेचा राष्ट्रवादीच्याच आमदाराला धक्का, चार नेत्यांच्या हाताला बांधलं शिवबंधन!

शिवसेनेचा राष्ट्रवादीच्याच आमदाराला धक्का, चार नेत्यांच्या हाताला बांधलं शिवबंधन!

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना आणखी एक धक्का बसला आहे. बीड नगरपालिकेतील काकू नाना विकास आघाडीच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  • Share this:

बीड 29 जानेवारी : राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना आणखी एक धक्का बसला आहे. बीड नगरपालिकेतील काकू नाना विकास आघाडीच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत काका आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने काम करण्याची इच्छा या नगरसेवकांनी व्यक्त केली. नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश केला आहे. त्यामुळे पुतण्याचे मतदारसंघासह नगरपालिकेतील वर्चस्व कमी होताना दिसत आहे.

पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 29 ग्रामपंचायतपैकी 21 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बाजी मारल्यानंतर पुन्हा एकदा जनतेच्या मानतील आमदार कोण असा प्रश्न निर्माण केला जात आहे. यातच बीड शहरातील काकू नाना विकास आघाडीमधील प्रमुख दावेदार म्हणून असलेले  नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, भैयासाहेब मोरे, रंजित बनसोडे या चार नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

(वाचा - 44 वेळा तुरुंगात गेलेत राकेश टिकैत, पाहा नक्की कोण आहेत)

या प्रवेशाने संदीप क्षीरसागर गटाला मोठा धक्का समजला जात असून विद्यमान आमदार बॅकफुटवर जात असल्याची चर्चा सुरू आहे. काकू नाना विकास आघाडीच्या नेत्याकडून विकास कामात मदत होत नाही. विरोधात असून नगराध्यक्ष यांनी कोट्यवधीची कामे केली. त्यामुळे विकासाच्या कामाला मदत म्हणून शिवसेनेत प्रवेश करत आहोत, असे या नगरसेवकांनी सांगितले.

क्षीरसागर कुटुंबात फूट पडण्याचे मुख्य कारण बीड नगरपालिका निवडणुक ठरली होती. पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी काकू नाना विकास आघाडी निर्माण करत स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यावेळी 20 नगरसेवक निवडून आणत काका नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांना धक्का दिला होता. मात्र त्यानंतर काही नगरसेवकांची पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती. आज पुन्हा 4 नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने बीड नगरपालिकेत फक्त 10 सदस्य काकू नाना विकास आघाडीकडे राहिले असून काका डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचे नगरपालिकेतील बळ वाढले आहे.

Published by: Kiran Pharate
First published: January 29, 2021, 3:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या