Home /News /maharashtra /

धक्कादायक! आश्रमातच सुरू होते अल्पवयीन मुलींवर अत्याचार, तब्बल 12 जणींची अशी केली सुटका

धक्कादायक! आश्रमातच सुरू होते अल्पवयीन मुलींवर अत्याचार, तब्बल 12 जणींची अशी केली सुटका

मुलींची सुटका केल्यानंतर आता अनेक देवस्थानांमध्ये ठेवलेला अल्पवयीन आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

बीड, 14 ऑगस्ट : बीड शहरापासून जवळच असलेल्या मांजरसुंबा घाटातील महानुभव पंथाच्या आश्रमातील एका 14 वर्षे वयाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची उघडकीस आल्यानंतर याच आश्रमावरील अन्य 7 मुली आणि 5 अल्पवयीन मुलांचीही जिल्हा बाल हक्क समिती आणि पोलीसांनी इथल्या अश्रमावर छापा मारून सुटका केली आहे. हा प्रकार गंभीर असल्याचे बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशिल कांबळे यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या त्या सात मुली व पाच मुलांना बाल कल्याण समितीच्या मार्फत सुधारगृहात ठेवण्यात आले असून पळवून नेलेल्या मुलीवर अत्याचार झाला आहे का? याचा तपास बालकल्याण समितीच्या मार्फत केला जात आहे. पवार कुटुंबात All is Not Well...! रोहितनं दिली पहिली प्रतिक्रिया देवस्थानावरील या मुलीच्या तक्रारीमुळे 7 मुलींची सुटका झाल्याचं समोर आलं आहे. मुलींची सुटका केल्यानंतर आता अनेक देवस्थानांमध्ये ठेवलेला अल्पवयीन आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सार्वजनिक ठिकाण असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा वावर असतो अशा ठिकाणी देवस्थानकडून मुला-मुलींचा कोणत्या सुरक्षा घेतल्या जातात. याबाबत आता पोलिसाने तपासणी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी केले आहे. शरद पवारांना पहिल्यांदाच ऐवढं रागवलेलं पाहिलं, पार्थच्या आत्याची प्रतिकिया मांजरसुंबा घाट चढून गेल्यावर एक श्रीकृष्णाचे मंदिर आहे. हे मंदिर महानुभव पंथाचे आहे. या ठिकाणी अनेक आश्रम आहेत यात महिला-पुरुष भक्त राहतात. तर काही मुलं मुली आध्यत्मिक शिक्षण घेण्यासाठी ठेवतात. अशाच एका 14 वर्षीय मुलीला 15 दिवसापुर्वी एका विवाहित भक्ताने तिला पळवून नेले. या प्रकरणात देवस्थानचा संबंध नाही, आम्ही शिक्षण देतो घडलेला प्रकार अनपेक्षित आहे. त्या संबधीत व्यक्तीवर कडक कारवाई करावी असे या देवस्थान सारंगधर महाराज यांनी सांगितलं. पुणेकरांसाठी अजित पवारांचा मोठा निर्णय, कोरोनाला हरवण्यासाठी देणार मोठा निधी या प्रकरणांमध्ये आता पोलीस तपासानंतर सत्य समोर येणार आहे. मात्र, देवस्थानावर अनधिकृतपणे मुलं आणि मुली शिक्षणाचा हेतूने की ठेवल्यानंतर त्यांच्या संदर्भात घडलेल्या गैरप्रकारात जबाबदार कोण असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे अशा मुलामुलींना शिक्षण देण्यासाठी ठेवत असताना देखील शासकीय परवानगी घेऊनच त्यांना आश्रमात ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कडून केली जात आहे तर पालकांनी देखील काळजी घ्यावी.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Beed

पुढील बातम्या