औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या दिलखुलास गप्पा, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर म्हणाले...

औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या दिलखुलास गप्पा, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर म्हणाले...

मी पक्षाचा झेंडा बदलला आहे, पक्षाची भूमिका तीच आहे. काही लोकांनी आपल्या भूमिका बदलल्या आणि सत्तेत आले. त्यांनी जाब विचारण्याची कोणाची हिमत्त नाही.

  • Share this:

औरंगाबाद, 14 फेब्रुवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या त्यांनी पत्रकारांशी अनौपचारीक चर्चा केली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या भाष्य केलं. शरद पवारांचे आणि माझे वैयक्तिक संबंध आहेत. EVM संदर्भात बोलण्यासाठी त्यांना भेटलो होतो. पण आमच्या मैत्रीच्या चर्चा रंगवल्या गेल्या. पवारांशी माझे चांगले संबंध असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, मी पक्षाचा झेंडा बदलला आहे, पक्षाची भूमिका तीच आहे. काही लोकांनी आपल्या भूमिका बदलल्या आणि सत्तेत आले. त्यांनी जाब विचारण्याची कोणाची हिमत्त नाही. मी मांडलेल्या मुद्द्यांवर अद्याप कोणताही पक्ष बोललेला नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

पुलवामा हल्ला संशयास्पद

आज पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा एक वर्ष पूर्ण झाले आहे. पुलवामा हल्ला हा घटवून आणला होता अशी आक्रमक प्रतिक्रिया त्यावेळी राज ठाकरेंनी दिली होती. यासंबंधी प्रश्न विचारला असता पुलवामा हल्ल्यामध्ये अनेक संशयास्पद पुरावे समोर आले होते असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं.

खरंतर, मुंबईतल्या भव्य अशा मोर्चानंतर राज ठाकरेंनी मिशन संभाजीनगर हाती घेतलं आहे. यासाठी ते औरंगाबादमध्ये दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याचा दुसरा दिवस होता. यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांशी बिनधास्त चर्चा केली. मनसेनं मोटारसायकल रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं. दुपारी काही पदाधिकारी यांच्यासोबत बैठक आणि सायंकाळी चार वाजता मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत.

इतर बातम्या- Valentine Day दिवशी धक्कादायक बातमी, हिंगणघाटसारख्या घटनेच्या तयारीत आरोपी

राज ठाकरेंच्या अनौपचारीक चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे

- मला हिंदू जननायक म्हणू नका

- शरद पवारांशी माझे चांगले संबंध आहेत

- ईव्हीएम संबंधी बोलण्यासाठी मी पवारांना भेटलो होतो.

- घुसखोरांना माझा आधीपासूनच विरोध आहे

- झेंड्यात बदल झाला पण भूमिकेत कुठेही बदल झालेला नाही

- झेंड्याबद्दल कोणतीही नोटीस आलेली नाही

- धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन

- औरंगाबदचं नाव बदललं तर हरकत काय आहे?

इतर बातम्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला शरद पवारांचा विरोध, पाहा VIDEO

- चांगले बदल झाले पाहिजेत. इतर लोक भूमिकेत बदल करून सत्तेत आले. त्यांना विचारण्याची हिम्मत आहे का?

- झेंडा हा विषय मी 3-4 वर्षांच्या आधी मांडला होता. पण आता त्यावर अधिकृत चर्चा झाली.

- झेंड्याचं रजिस्ट्रेशन निवडणूक आयोगाला 4 वर्षांआधी दिलं होतं

- दोन महिन्यापूर्वी यावर अधिकृत चर्चा झाली आणि ठरवलं

- एखाद्या शहराचा विकास राजकीय अजेंडा नाही, माझं पॅशन आहे

- निवडणुकांमध्ये रेल्वे इंजिनाचाच वापर होणार

- आम्ही छेडलेल्या मुद्द्यांना कोणीही हात घातलेला नाही

- व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्याऐवजी महिला सुरक्षेकडे लक्ष देणं महत्त्वाचं

इतर बातम्या - भीषण अपघात! मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलावरून खाली कोसळली कार

First published: February 14, 2020, 11:43 AM IST

ताज्या बातम्या