मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून BAMSच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून BAMSच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

रॅगिंग मुळे गणेशच्या आई वडिलाचे मुलाला डॉक्टर झालेलं पाहण्याचे स्वप्न कायमचे भंगले.

रॅगिंग मुळे गणेशच्या आई वडिलाचे मुलाला डॉक्टर झालेलं पाहण्याचे स्वप्न कायमचे भंगले.

रॅगिंग मुळे गणेशच्या आई वडिलाचे मुलाला डॉक्टर झालेलं पाहण्याचे स्वप्न कायमचे भंगले.

बीड 8 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातील नाळवंडी येथील गणेश कैलास म्हेत्रे या विद्यार्थ्यांने सतत होणाऱ्या रँगिंगच्या त्रासाला कंटाळून विष घेवून जीवन संपवले. गणेश हा उदगीर येथील धनवंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात बी.ए.एम.एस.च्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. या ठिकाणी होणाऱ्या रॅगिंग बाबतीत गणेशने कुंटुबाला माहिती दिली होती. गणेशच्या वडिलांनी महाविद्यालयातील प्रशासनाला व संबंधित प्राध्यापकांनाही तोंडी तक्रार दिली होती. मात्र महाविद्यालयाकडून यानंतर कसलाच त्रास होणार नाही याची काळजी घेऊ म्हणून सांगण्यात आले होते. मात्र त्यात फरक पडला नाही त्यामुळे गणेशने टोकाचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं. रॅगिंग मुळे गणेशच्या आई वडिलाचे मुलाला डॉक्टर झालेलं पाहण्याचे स्वप्न भंगले. या बाबतीत महाविद्यालय प्रशासन आणी रँगिंग करणाऱ्यावर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली. बीड तालुक्यातील नाळवंडी येथील गणेश म्हेत्रे हा शेतकरी कुटुंबातील मुलगा लातूर जिल्ह्यात उदगीर येथे धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात बी.ए.एम.एस. च्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. मुलाने डॉक्टर व्हावे यासाठी वडिलांनी कर्ज काढून फी भरली होती.

'मनसे'च्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली, फक्त सभा घेण्याची अट

गणेश देखील जिद्दीने वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे म्हणून शिक्षण घेत होता मात्र महाविद्यालयातील काही सिनियर्सकडून सतत टोमणे आणी घालून पाडून बोलल जात होतं. हा प्रकार वारंवार होत असल्याचं त्याने नातेवाईकांना बोलून दाखवले होते.  या प्रकाराबाबत महाविद्यालयात त्याच्या वडिलांनी तोंडी तक्रार केली होती.

हिंगणघाट पीडिता व्हेंटीलेटरवर, ताज्या मेडिकल बुलेटीनने चिंता वाढवली

मात्र त्रास सुरुच असल्याने तसेच वडिलांच्या स्वप्नाचं दडपण यामुळे मानसिक तणावात असलेल्या गणेशने गावी येवून विष पिवून आत्महत्या केल्याचे गणेशचे काका राधाकिसन म्हेत्रे यांनी सांगितले. यावर महाविद्यालय प्रशासनाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
First published:

पुढील बातम्या