बिघाड EVMमध्ये नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या डोक्यात झालाय - मुख्यमंत्री

बिघाड EVMमध्ये नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या डोक्यात झालाय - मुख्यमंत्री

'काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकांसोबत असलेली नाळ तुटली आहे. सत्तेपासून दूर राहणं त्यांना सहन होत नाही. आता लोकच त्यांना धडा शिकवतील.'

  • Share this:

विशाल माने, परभणी 29 ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. आज दुपारी परभणीत झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुफान हल्ला चढवला. गेली पाच वर्ष विरोधकांनी लोकांमध्ये न जाता फक्त EVMच्या नावाने गळे काढले. बिघाड हा EVMमध्ये नसून तो काँग्रेस-राष्ट्रवादीच्या डोक्यात असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. त्यांची 50 वर्ष आणि आमची 5 वर्ष अशी तुलना करा असं आवाहनही त्यांनी विरोधी पक्षांना दिलं. मराठवाड्याला काहीही कमी पडू देणार नाही असं आश्वासन त्यांनी लोकांना दिलं.

मुख्यमंत्री आपल्या भाषणात पुढे म्हणाले, कर्जमाफी योजना बंद केली नाही, सुरूच आहे, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मदत देणार आहोत. 4 हजार किमीची पाईप टाकून मराठवाड्यातील धरणे जोडणार आहोत. कोकणातून वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार असल्याचंही त्यांनी सांगितं.ग्रामीण भागातील गायरान जमिनी मालकी हक्काने देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठा समाजाला आरक्षण दिले, धनगर समाजाला हजार कोटी दिलेत. समाजातील सगळ्यांसाठी काम करत आहोत आणि करत राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची बोलणी निष्फळ, 'वंचित' देणार धक्का!

काका आधीच पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कारण राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांचे पुतणे आणि आमदार अवधूत तटकरे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अवधूत तटकरे हे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतील, अशी माहिती आहे.

सुनील तटकरे हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. मात्र स्वत: तटकरे यांनी ही चर्चा फेटाळून लावत आपण कायम पवारसाहेबांसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. पण त्यानंतर आता सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत तटकरे यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

शिवस्वराज्य यात्रेवर टीका करणाऱ्या दानवेंवर मुंडेंचा पलटवार, म्हणाले...

तटकरे Vs तटकरे

काका-पुतण्या वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. अनेक राजकीय पक्षातील काका आणि पुतण्यामधील वाद महाराष्ट्रभर गाजला आहे. रायगडच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारं तटकरे कुटुंबही याला अपवाद नाही. सुनील तटकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांचे पुतणे आणि आमदार अवधूत तटकरे यांचे भाऊ संदीप तटकरे यांनी 2016 मध्येच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच तटकरे कुटुंबीयांसाठी हा मोठा राजकीय धक्का असेल.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 29, 2019, 3:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading