पुजाऱ्याचा दगडाने ठेचून खून.. मंदिरातील दानपेट्या पळवल्या, बीडमधील प्रकार

पुजारी रामलिंग ठोंबरे हे दहिफळ वडमाऊली देवीच्या मंदिरात मागील 25 वर्षांपासून सेवा करत होते.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 02:56 PM IST

पुजाऱ्याचा दगडाने ठेचून खून.. मंदिरातील दानपेट्या पळवल्या, बीडमधील प्रकार

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,3 नोव्हेंबर : केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील वडजुआई देवी मंदिरात पुजाऱ्याचा दगडाने ठेचून खून करून चोरट्यांनी दानपेट्या पळवल्या. रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. रामलिंग ठोंबरे (वय-55) असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

मिळालेली माहिती अशी की, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून पुजारी रामलिंग ठोंबरे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. दानपेट्या फोडून देणगीची रक्कम चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चोरट्यांनी देवीचे दागिनेही पळवून नेले आहेत. तसेच दानपेट्या फोडून त्यातील रक्कम घेऊन आरोपी पसार झाले आहेत. पुजारी रामलिंग ठोंबरे हे दहिफळ वडमाऊली देवीच्या मंदिरात मागील 25 वर्षांपासून सेवा करत होते. अमावस्या आणि पोर्णिमेला दहिफळ वडमाऊली येथील वडजुआई देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे मंदिरातील दानपेटीत मोठ्याप्रमाणात देणगी येते. दानपेट्यांमधील मोठी रक्कम चोरली गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मांजरसुंबा घाटात स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळली; तीन ठार, एक गंभीर

कपीलधारकडून मांजरसुंब्याच्या घाटमार्गाने बीडकडे येणाऱ्या स्कार्पिओ गाडीला भीषण अपघात झाला. गाडी खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागेवर तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णायलयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली.

Loading...

हरीश कांबळे (वय 30), सचिन सुरवसे (वय 32), संतोष काळे, धम्मानंद वीर व (सर्व राहणार बीड) हे फिरण्यासाठी कपीलधार येथे जात होते. यावेळी मांजरसुंबामार्गे कपीलधारकडे जात असताना घाटातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने स्कार्पीओ (एमएच-14 एवाय-1485) दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये हरीश कांबळे, सचिन सुरवसे यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष काळेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धम्मानंद वीर हा गंभीर जखमी असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

VIDEO:अवघ्या 20 रुपयांत पोटभर जेवण देणाऱ्या उपहारगृहाचं मेट्रोमुळे स्थलांतर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 02:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...