MIM भूमिकेवर ठाम, प्रकाश आंबेडकरांची 'ही' ऑफर मान्य नाही - इम्तियाज जलील

'आंबेडकरांची 8 जागांची ऑफर मान्य करणं किंवा बाहेर पडणं हे आमच्यासमोर दोनच पर्याय होते. आम्ही आमच्या हिताचा निर्णय घेतला.'

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 05:24 PM IST

MIM भूमिकेवर ठाम, प्रकाश आंबेडकरांची 'ही' ऑफर मान्य नाही - इम्तियाज जलील

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद 9 सप्टेंबर : MIM आणि प्रकाश आंबेडक यांच्यात निर्माण झालेला पेच सुटण्याची शक्यता नाहीच. प्रकाश आंबेडकरांनी आघाडी कायम असल्याचं सांगितलं तरी तोडगा निघण्याची शक्यता कमीच असल्याचं स्पष्ट होतंय. MIMचे खासदार इम्जियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन MIM आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. आंबेडकरांनी दिलेली 8 जागांची ऑफर कदापीही मान्य केली जाऊ शकत नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं. सध्या आंबेडकरांसोबत कुठलीही चर्चा सुरू नसून आम्ही आशा सोडलेली नाही असंही जलील यांनी सांगितलं.

ते म्हणाले, एमआयएम उद्यापासून स्वतंत्र मुलाखती सुरू करणार आहे. मालेगाव, नांदेड विभागासाठी या मुलाखती असतील. वंचित आणि एमआयएममुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाल्या होत्या. सर्व जाती धर्म एजत्रा आलेत. एमआयएमला भाजपची बी टीम  म्हणणारे आता भाजप सोबत आहेत. आंबेडकरांबद्दल आजही आदर आहे मात्र मतभेदांनाही जागा आहे.

प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेलाही 'लोकसभा पॅटर्न', केली मोठी घोषणा

आंबेडकरांच्या आदेशानुसार आम्ही एमआयएमची 98 जागांची यादी 3 महिन्यांआधीच दिली होती. त्यानंतर आमहाला कळलं की 98 जागांवर लढणं शक्य नाही. त्यानंतर आम्ही सर्व्ह केला आणि कमीत कमी जागा लढवून जास्तीत जास्त विजय मिळवण्यासाठी 74 जागांची यादी पुन्हा पाठवली. मात्र खूप दिवस झाले तरी आम्हाला उत्तर मिळालं नाही 74 जागांवर ही आम्ही तडजोड करायला तयार होतो. 2 दिवसांचा अवधी देऊनही लवकर उत्तर नाही. नंतर आंबेडकरांकडून मेल पाठवून MIMला 8 जागांवर लढण्यास सांगण्यात आलं.

ऐश्वर्याच्या वादग्रस्त Memeनंतर पहिल्यांदाच भेटले विवेक-अभिषेक, पाहा काय घडलं

Loading...

आंबेडकर आणि ओवेसींची पुण्यात बैठक झाली. मात्र निर्णय होऊ शकला नाही. 8 जागांची ऑफर मान्य करणं किंवा बाहेर पडणं हे आमच्यासमोर दोनच पर्याय होते. यात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय. मला त्यांच्या पेक्षाही जास्त बोलता येतं असा टालाही त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, आंबेडकर म्हटले असले तरी एमआयएम तर्फे मी किंवा ओवेसी चर्चा करत नाही. आणि सध्या कुठलीही चर्चा सुरू नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...