जालन्यात 'ट्रिपलसीट' चोरट्यांची दहशत, हातात आहे तलवार आणि खंजीर!

जालन्यात 'ट्रिपलसीट' चोरट्यांची दहशत, हातात आहे तलवार आणि खंजीर!

चोरट्यांच्या हातात खंजीर, तलवार असून ते एका दुचाकीवर पहाटे 2 ते 2.30 वाजेच्या दरम्यान, रस्त्यावर व गल्लीबोळात फिरत आहेत.

  • Share this:

विजय कमळे पाटील,जालना 18 ऑगस्ट : काही वर्षांपूर्वी चड्डी बनियान टोळीने धुमाकू घातल्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती. आता मराठवाड्यातलं औद्यागिक शहर असलेल्या जालन्यात 'ट्रिपलसीट' चोरट्यांची दहशत निर्माण झालीय. एका बाईकवर हे तिघं चोरटे फिरत असून त्यांच्याकडे शस्त्र आहेत. मध्यरात्री ही लुटारुंची टोळी पाहिल्याचा दावा अनेकांनी केलाय. त्यांमुळे शहरात आता नागरिक आणि पोलीस हे गस्त घालत असून चोरांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी सापळाही लावला आहे.

फक्त एका दोरीनं केली माय लेकरांची मृत्यूच्या दाढेतून सुटका

शहरातील नवीन जालना भागात सध्या दुचाकीवर फिरत असलेल्या ट्रिपलसीट चोरट्यांची दहशत पसरलीय. एका दुचाकीवर स्वार असलेले हे अनोळखी इसम रात्री 2 ते 2.30 वाजेच्या दरम्यान, रस्त्यावर व गल्लीबोळात फिरत असून त्यांच्या तोंडाला रुमाल बांधलेला आहे. त्यांच्या हातात खंजीर, तलवार किंवा टॉमी असते. गेल्या 15 दिवसात मोदीखाना, पेन्शनपुरा, गोपालपुरा, बडी सडक, कावडपुरा, हमालपुरा, सिंधी मंदिर या परिसरातील अनेक नागरिकांनी त्यांना पाहिल्याचा दावा केलाय.

तीन भारतीय महिला पाकिस्तानला ठरल्या भारी, हा VIDEO पाहाच

त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या 'ट्रिपलसीट' चोरट्यांनी पोलिसांना जणू खुले आव्हानच दिले आहे. पोलीस मात्र अद्यापही या चोरट्यांचा छडा लावण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याने आता या परिसरातील तरुण मंडळीही रात्रीभर हातात दांडूके घेऊन गस्त घालत आहे. दरम्यान, पोलिसांनी या परिसरात नाकाबंदी आणि पेट्रोलिंग लावली होती. त्यामुळे काल पोलिस आणि नागरिक एकत्रितपणे पेट्रोलिंग करताना पाहायला मिळाले.

 अ‍ॅम्बुलन्समधून दारुची तस्करी

आरोग्यदृष्ट्या संकटात सापडलेल्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रात सुरू केलेल्या 108 या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अवैध दारु तस्करी होत असल्याची धक्कादायक घटना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरात उजेडात आली आहे. शहरातील रामनगर पोलिसांनी बाबुपेठ भागातून 108 रुग्णवाहिकेतून सहा लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीच्या या आमदाराचे राहुल गांधींना आवाहन, म्हणाले अजूनही वेळ गेली नाही!

चंद्रपूर जिल्ह्यात गेली चार वर्षे दारूबंदी लागू करण्यात आली आहे. या दारूबंदीनंतर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची दारू अवैधरित्या पोहचत असून या प्रकरणात आजवर हजारो आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दारुबंदीविरोधातील कारवाई सातत्याने सुरू असताना शहरातील बाबुपेठ भागातून गुप्त माहितीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने 108 रुग्णवाहिकेत दडवलेली सहा लाख रुपये किमतीची दारू जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 06:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading