Home /News /maharashtra /

धक्कादायक: गोकुळाष्टमीच्या उपवासाच्या भगरीतून शंभर जणांना विषबाधा

धक्कादायक: गोकुळाष्टमीच्या उपवासाच्या भगरीतून शंभर जणांना विषबाधा

गावातीलच एका किराणा दुकानातून भगर खरेदी केली होती. भात खाल्ल्यानंतर महिला, ग्रामस्थांना मळमळ, उलटी, जुलाब आदी त्रास जाणवू लागला.

बीड 11 ऑगस्ट: गोकुळाष्टमीला उपवासाची भगर खाल्याने तब्बल 100 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे घडली आहे. त्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधितांना उलटी, मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही रुग्णांना बीड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी यांनी तळणेवाडी येथे धाव घेऊन ज्या कोणाला त्रास होत असेल त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गोकुळाष्टमीला अनेक जण उपवास धरतात. दरम्यान गेवराई तालुक्यातील धोंडराई पासून जवळच असलेल्या तळणेवाडी येथील नागरिकांनी गोकुळाष्टमी उपवासानिमित्त गावातीलच एका किराणा दुकानातून भगर खरेदी केली होती. भगरीचा भात खाल्ल्यानंतर महिला, ग्रामस्थांना मळमळ, उलटी, जुलाब आदी त्रास जाणवू लागला. सायंकाळी चार नंतर गावातील जवळपास शंभरहून अधिक जणांना अधिकच त्रास जाणवू लागल्याने चांगलीच धांदळ उडाली. त्रास जाणवू लागलेल्या महिला, ग्रामस्थांना वाहनाद्वारे गेवराई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यूपीचा आहे का? वडिलांसमोर मुलाला लोखंडी रॉडने अमानुष मारहाण तर काही जण  उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.  असाच प्रकार मागच्या वर्षी अंबाजोगाई तालुक्यातही घडला होता. सरकारने या प्रकणात लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींना शिक्षा करावी अशी मागणी होत आहे. भगरीचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. फक्त 5 पदार्थ; मधुमेही रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास करतील मदत वारंवार या भागात अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ही भगर कुठून आणली गेली, त्याचा पुरवठादार कोण आहे? ती भगर बनावट होती का? या मागे कुठली टोळी आहे का? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. या प्रकरणी चौकशी झाली तर त्यात अनेक मासे गळाला लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या