भाजप आमदार पुत्राचा भर सभेत पाणउतारा, सभा गुंडाळून घ्यावा लागला काढता पाय

भाजप आमदार पुत्राचा भर सभेत पाणउतारा, सभा गुंडाळून घ्यावा लागला काढता पाय

नेते फक्त निवडणुकीच्या काळातच भेटीला येतात, निवडून आले की फिरकतही त्यामुळे आम्ही आता मदत का करायची?

  • Share this:

सुरेश जाधव, शिरूर कासार, 16 ऑक्टोंबर : आमदारांच्या कामाचा पंचनामा करताना बऱ्याच वेळा लोक आक्रमक होतात. नेते फक्त निवडणुकीच्या काळातच भेटीला येतात, निवडून आले की फिरकतही नाहीत हा अनुभव बऱ्याच वेळा मतदारांना येतो. असाच अनुभव आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांच्या मुलाला आला. तुम्ही कधी गावकऱ्यांना योग्य मदत करत नाही त्यामुळे उगाच तुम्ही गावकऱ्यांना काही शिकवू नका असं सांगत लोक आक्रमक झाले आणि आमदार पुत्राला सभेतून काढता पाय घ्यावा लागला. त्याचं घडला असे की मतदारसंघातिल शिरूर कासार तालुक्यातील टेंभुर्णी येथे कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.सभेसाठी आमदाराचे सुपुत्र अजय धोंडे उपस्थिती होते यावेळी सभा सुरु होताच अजय धोंडे यांनी गावातले लोक राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहे आजबे यांना मदत करत असल्याबद्दल नाराजीचा सूर व्यक्त केला. तुम्ही मुंडे साहेबांचं, पंकजाताईंचं काम केलं पाहिजे असा आग्रह केला. आमदार पुत्रांच्या या वक्तव्याने लोक चांगलेच भडकले. एका कार्यकर्त्याने उभे राहून त्यांच्याशी वाद घालायला सुरूवात केली.

BREAKING : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ला, प्रचार सभेत हातावर वार!

गोपीनाथ मुंडे असताना धोंडे हे काँग्रेसमध्ये होतो. तोच धागा पकडत त्या कार्यकर्त्याने त्यांना चांगलंच सुनावलं. तो म्हणाला, बाळासाहे आजबे काका कसेही असो पण त्यांनी मुंडे साहेब यांना कधी विरोध केला नाही की त्रास दिला नाही. उलट तुम्हीच त्यांना त्रास दिला. आजबे आम्हाला मदत करतात. मात्र तुम्ही हात आखडता घेता.

राणेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

गावात धार्मिक सप्ताह असो की कुठला कार्यक्रम तुम्ही पैसे थोडे देता आणि जास्त चकरा मारायला सांगता. कार्यकर्त्यांच्या या बोलण्यावर अजय धोंडे समर्थक त्या प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला  धक्के देत बाहेर काढण्यासाठी पुढे आले. मात्र त्यानंतर गावकरी अधिकच आक्रमक झाले. लोकांना बोलू द्या, त्याचा अधिकार आहे असं म्हणतं सभेत गोंधळ सुरू झाला. परिस्थिती अनुकूल नाही असं दिसल्याने आमदार पुत्रांने सभेतून काढता पाय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 12:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading