मोदींच्या सभेला गेलेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात, मदतीला धावून आले धनंजय मुंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परळीतील सभेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या बीड पोलिस दलातील दंगल प्रतिबंधक पथकाच्या गाडीला अपघात झाला.

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2019 07:11 PM IST

मोदींच्या सभेला गेलेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात, मदतीला धावून आले धनंजय मुंडे

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,17 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परळीतील सभेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या बीड पोलिस दलातील दंगल प्रतिबंधक पथकाच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात 15 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे हा अपघात झाला. जखमींना माजलगाव, बीड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. चालक गंभीर जखमी झाला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे उमेदवार धनंजय मुंडे हे तातडीने अपघातग्रस्त पोलिसांच्या मदतीला धावून आले.

दरम्यान, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरूवारी सकाळी परळीत जाहीर सभेला संबोधित केले. गोपीनाथ मुंडेंच्या कर्मभूमीत आलो आहे. मराठवाडा ही संतांची पावन भूमी आहे. एकाचवेळी 'वैद्यनाथ' आणि 'जनता जनार्दन' अशा दोन देवांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले, असे मोदींनी सांगितले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातही कलम 370 चा नारा कायम ठेवला. कलम 370 ला विरोध केल्याप्रकरणी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. या वरून सरकारची खिल्ली उडवणाऱ्यांची इतिहासात नोंद होईल. देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

परळीत काय म्हणाले पंतप्रधान...?

Loading...

पंतप्रधान म्हणाले, 5 वर्षांत केलेल्या विविध विकास कामामुळे जनता भाजपच्या पाठीशी आहे. मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. यासाठी सरकार 3.5 लाख कोटी रुपये खर्च करणार आहेत. वॉटर ग्रीडसारख्या विशेष प्रकल्पाद्वारे येथील पाणी प्रश्न सोडवणार आहे. 2022 पर्यंत प्रत्येक घरात नळ पोहोचवण्याचा संकल्प असल्याचे मोदी म्हणाले.

भाषणातील ठळक मुद्दे...

- येत्या पाच वर्षांत एक कोटी महिलांना बचत गट योजनेशी जोडणार.

- देशातील नागरिकांना थेट खात्यात अनुदान दिले. दलाली करणाऱ्यांना धडा शिकवला.

- अल्पभूधारक शेतकरी, मजूर अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी पेन्शन. वयाच्या 60 वर्षांनंतर तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन देणार.

- ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी महामंडळाची स्थापना करणार.

- 370 हटवल्याने महिला, दलितांना न्या मिळाला, देशहिताच्या निर्णयाला स्वार्थी लोकांचा विरोध

- 5 वर्षांत केलेल्या कामामुळे लोक भाजपच्या पाठीशी - पंतप्रधान मोदी

- आघाडीतील थकलेले लोक तुमचे भलं करू शकत नाही तर मग त्यांना निवडून का द्यायचे?

- काँग्रेस- राष्ट्रवादीतील लोक पक्षांतर का करत आहेत? आघाडीतील तरुण पक्ष सोडून जात आहेत. तर वरिष्ठ डोक्याला हात लावून बसलेत

- तुम्ही भाजपला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंसारखे नेते दिले. पण आज ते आपल्यात नाहीत. जेथे असतील तेथून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंसारख्या नेत्यांना आशीर्वाद देत असतील.

VIDEO : हर्षवर्धन जाधव बावळट आणि मनोरुग्ण, चंद्रकांत खैरेंचा पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 07:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...