मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मराठवाड्याचा सुपुत्र शहीद, नववर्षाच्या सुरुवातीलाच आली दु:खद बातमी

मराठवाड्याचा सुपुत्र शहीद, नववर्षाच्या सुरुवातीलाच आली दु:खद बातमी

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महेश यांच्या निधनाचे वृत्त समजताच लाडझरी गावासह परळी तालुक्यात शोककळा पसरली

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महेश यांच्या निधनाचे वृत्त समजताच लाडझरी गावासह परळी तालुक्यात शोककळा पसरली

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महेश यांच्या निधनाचे वृत्त समजताच लाडझरी गावासह परळी तालुक्यात शोककळा पसरली

बीड, 2 जानेवारी: युद्धाचा सराव करत असताना परळी तालुक्यातील लाडझरी गावातले जवान पंजाब येथे शहीद झाले आहेत. महेश तिडके असं शहीद जवानाचे नाव असून ते तीन वर्षांपूर्वी सैन्य दलात रुजू झाले होते. बुधवारी (1 जानेवारी) सकाळी पंजाब येथे सुरू असलेल्या युद्धाच्या कसरतीत त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन वर्षाचा मुलगा आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महेश यांच्या निधनाचे वृत्त समजताच लाडझरी गावासह परळी तालुक्यात शोककळा पसरली. लाडझरी येथे गुरूवारी सकाळी महेश यशवंत तिडके यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शहीद महेश तिडके यांना श्रद्धांजली वाहत आपले बलिदान सदैव स्मरणात राहील, असे म्हटले आहे.

दरम्यान, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सीमेवरून महाराष्ट्रासाठी दुखद बातमी आली होती. नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये सातारा जिल्ह्यातील संदीप सावंत या जवानाला वीरमरण आले. या चकमकीमध्ये दोन जवान शहीद झाले होते. त्यातील एक जवान गोरखपूरचे असून दुसरे जवान साताऱ्यातील कराड तालुक्यातील आहेत. दुसऱ्या दिवशी मराठवाड्याचा सुपुत्र महेश यशवंत तिडके हे शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.

दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण,2 महिन्यांची लेक झाली पोरकी

सशस्त्र पाकिस्तानी घुसखोरांशी दोन हात करताना कराड तालुक्यातील मुंडे गावचे सुपुत्र संदीप सावंत शहीद झाले आहेत. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारपर्यंत शहिद संदीप यांचे पार्थिव मुळगावी येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शहीद संदीप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, वहिणी आणि दोन महिन्यांची मुलगी आहे. संदीप यांच्या जाण्यामुळे सावंत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजूनही नौशेरा सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. आजपासून जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. एका बाजूला नव्या वर्षाचा उत्साह आणि नव्या वर्षानिमित्तानं जम्मू -काश्मीरमध्ये पुन्हा इंटरनेट सेवा सुरू होताच वाईट बातमी आली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी खारी थरयाट जंगलात घुसखोरी करून कब्जा केला होता. पाकव्याप्त काश्मीरमधून ते भारताच्या हद्दीत घोसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती जवानांना मिळताच सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये दोन जवान शहीद झाले आहेत. अजूनही सर्च ऑपरेशन जारी असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी लेफ्टिनेंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली.

First published:

Tags: Beed latest news, Beed parli