'तो' मनस्ताप सहन न झाल्याने धुणी-भांडी करणाऱ्या 70 वर्षीय महिलेने केली आत्महत्या

छबाबाई या मागील दोन वर्षांपासून मंजूबाई यांच्या घरी धुणी भांडी करत होत्या

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 07:54 PM IST

'तो' मनस्ताप सहन न झाल्याने धुणी-भांडी करणाऱ्या 70 वर्षीय महिलेने केली आत्महत्या

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,9 नोव्हेंबर: परळी शहरातील स्नेह नगरात धुणी-भांडी करणाऱ्या 70 वर्षीय महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. छबाबाई नारायण पाचमासे असे मृत महिलेचे नाव आहे.

चोरीचा खोटा आरोप...

छबाबाई यांचा हात मोडला म्हणून घरकामास न गेल्याने मालकीनबाईने त्यांच्यावर चोरीचा आरोप केला होता. हा खोटा आरोप सहन न झाल्याने छबाबाई यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. मंजूबाई गणेश पुजारी असे मालकीनचे नाव आहे. मंजूबाई या स्नेह नगर येथे राहतात. छबाबाई या मागील दोन वर्षांपासून मंजूबाई यांच्या घरी धुनी भांडी करत होत्या. छबाबाई यांचा हात मोडल्यामुळे त्या गेल्या आठवडाभरापासून कामास गेल्या नाही. मंजूबाई यांनी याचा राग मनात धरत छबाबाईला धमकावले. जर कामास आली नाहीस तर तुझी पोलिसांत तक्रार देईल, अशी धमकी दिली. यानंतर मंजुबाई पुजारी यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये सोने, चोरी करून छबुबाई कामास येत नसल्याची तक्रार दिली. याचा मनस्ताप करत छबुबाई यांनी शुक्रवारी संध्याकाळी राहत्या घरी विष प्राशन केले. उलट्या होत आहेत म्हणून त्यांच्या मुलाने त्यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान छबुबाई यांचा मृत्यू झाला.

शेजारच्या महिलेने केला आरोप...मुलाने रेल्वेसमोर घेतली उडी

Loading...

दरम्यान, गेल्या महिन्यात औरंगाबाद शहरात अशीच घटना घडली होती. शेजारी राहणाऱ्या महिलेने शाळेत येऊन वर्गमित्रांसमोर 50 रुपये चोरल्याचा केलेला आरोप सहन न झाल्याने सहावीत शिकणाऱ्या एका मुलाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती. सुरज जनार्धन क्षीरसागर (वय-12) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने औरंगाबादेतील शिवाजीनगर भागात रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

सुरज हा सहावी वर्गात होता, तो गुरुवारी शाळेत जाण्यापूर्वी घराशेजारी असलेल्या किराणा दुकानात गेला होता. त्याची परीक्षा सुरू असल्याने तो बहिणीसोबत शाळेत गेला होता. मात्र, त्यानंतर किराणा दुकान चालवणारी महिला सरला धुमाळ यांना सुरजने गल्ल्यातील 50 रुपये चोरले असा संशय घेतला. सरला धुमाळ यांनी सुरजच्या शाळेत जाऊन त्याच्या वर्गमित्रांसमोर 'सुरजला पकडा त्याने माझे पैसे चोरले', असा आरोप केल्याने सुरजला अपमान झाल्याचे वाटले. तो शाळेतून निघून गेला. त्यानंतर तो परत शाळेत आला होता. परंतु महिला शाळेजवळच असल्याने तो परत पळून गेला आणि त्याने शिवाजी नगर येथील रेल्वेरुळावर रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. गारखेड्यातील कै.सौ. कलावती चव्हाण प्राथमिक विद्या मंदिर या शाळेचा सुरज विद्यार्थी होता. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस स्टेशनमध्ये आरोप करणारी महिला सरला धुमाळच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...