मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेना नगरसेवकाच्या हत्येतील आरोपीला संपवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी उधळला 'फिल्मी स्टाईल' कट

शिवसेना नगरसेवकाच्या हत्येतील आरोपीला संपवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी उधळला 'फिल्मी स्टाईल' कट

काही महिन्यांपूर्वी परभणी महापालिका नगरसेवक अमरदीप रोडे यांची हत्या करण्यात आली होती.

काही महिन्यांपूर्वी परभणी महापालिका नगरसेवक अमरदीप रोडे यांची हत्या करण्यात आली होती.

काही महिन्यांपूर्वी परभणी महापालिका नगरसेवक अमरदीप रोडे यांची हत्या करण्यात आली होती.

  • Published by:  Akshay Shitole

विशाल माने, परभणी, 3 जानेवारी : शिवसेना नगरसेवक खून प्रकरणात जामीनावर बाहेर असलेला आरोपी रवी गायकवाड याच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. या आरोपींकडून एक रिव्हॉल्वर, गावठी पिस्तूल आणि काही काडतुसे ताब्यात घेतली आहेत. तसंच चारही आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी परभणी महापालिका नगरसेवक अमरदीप रोडे यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी रवी गायकवाड आणि त्याच्या अन्य एका साथीदारावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन झालेला आरोपी रवी गायकवाड सध्या जामिनावर बाहेर आहे. रवी हा विधी शाखेचा विद्यार्थी असून, शहरातील शिवाजी महाविद्यालय येथे त्याची परीक्षा होती. त्या ठिकाणी त्याच्या हत्तेचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस आणि अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली.

पुण्यात दोन गटामध्ये तुफान हाणामारी, 4 दुचाकी जाळल्या

रवीच्या सुरक्षेसाठी त्याच्या आजूबाजूला, साध्या वेशातील पोलिसही पाळतीवर ठेवले. त्यावेळी संशयित म्हणून माहिती मिळालेले आरोपी बो उर्फ देवेंद्र देशमुख, शेख फिरोज शेख सलीम, हे त्यांना आढळून आले. पण पोलिसांच्या हाती लागण्याआधीच त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. यावर त्यांचा माग काढत असलेल्या पोलिसांना खबऱ्याद्वारे बुधवारी संध्याकाळी, शेख फिरोज शेख सलीम, सचिन पवार आणि मनोज पंडित हे तीन आरोपी, जिंतूर रोडवरील एका जिममध्ये आल्याची माहिती मिळाली.

ट्रकच्या जोरदार धडकेत बसचा चक्काचूर; शिक्षक जागीच ठार, 7 जखमी

त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, धाड टाकून तिघांनाही ताब्यात घेतले. तेव्हा फिरोज यांच्याकडून एक हँड बॅग मध्ये काळ्या रंगाचे रिव्हॉल्वर, देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि काही काडतुसे मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणातील अन्य आरोपी, बो उर्फ देवेंद्र देशमुख यालाही त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कोयता आणि खंजीर आढळून आले.

दरम्यान या प्रकरणातील चारही आरोपींच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तर जामिनावर बाहेर असलेल्या रवीच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

First published:

Tags: Parbhani crime story, Parbhani news