जुना फोटो व्हायरल होत असल्याने पंकजा मुंडे भडकल्या

जुना फोटो व्हायरल होत असल्याने पंकजा मुंडे भडकल्या

ट्रोल करणाऱ्या माणसाच्या बुद्धिची किव येते. ही माणसं दुष्ट आणि भ्रष्ट आहेत. किमान संवेदनशीलता तरी त्यांनी बाळगली पाहिजे.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड 13 ऑगस्ट : कोल्हापूर, सांगली मध्ये पुराची गंभीर परिस्थिती असतांना संवेदनशील मुद्यावर तरी संवेदना बाळगा असें भावनिक आवाहन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी नेटकऱ्याना केलंय. जुना फोटो व्हायरल होत असल्याबद्दलही त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्या परळीत माध्यमांनी बोलत होत्या. गेल्या दोन दिवसां पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडें, विनोद तावडे यांचा जुना फोटो सोशल मीडियावर टाकून ट्रोल केला जातोय. यात सर्वनेते हसतानाचा फोटो आहे. यावर आज पंकजा मुंडेंनी नेटकऱ्याना खडे बोलही सुनावले.

'जनाची नाही तर मनाची असेल तर CMनी त्या दोन मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा'

पंकजा मुंडे म्हणाल्या, की तसे मी ट्रोल गांभीर्याने घेतं नाही पण महापुरासारख्या गंभीर स्थितीमध्ये विरोधकांकडून तीन वर्षापूर्वी अधिवेशनाच्या चहा पानाच्या वेळचा फोटो सोशल मीडियावर टाकून ट्रोल करण्यात येतंय. तो फोटो जर नीट पाहिला तर त्या मध्ये स्व.भाऊसाहेब फुंडकर आहेत. ते आज हयात नाहीत. किमान त्याचं तरी भान ठेवा असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

त्या पुढे म्हणाल्या, ट्रोल करणाऱ्या माणसाच्या बुद्धिची कीव येते. ही माणसं  दुष्ट आणि भ्रष्ट आहेत. टीका करायची म्हणून जुने फोटो टाकून आजच्या विषयाशी संदर्भ जोडण्यात येतोय तो चुकीचा आहे. टीका टिपण्णी आता अंगवळणी पडली आहे मात्र अशा गंभीर परिस्थितीमध्ये नेटकरी अपुऱ्या माहितीवर आरोप प्रत्यारोप करतात याचं दुःख होतं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

'कोल्हापूर अमित शहांची सासुरवाडी, हवाई पाहणी पेक्षा त्यांनी मदत करावी'

बऱ्याच वेळा अशा गंभीर परिस्थिती मध्ये विरोधक सत्ताधारी एकत्रित येवून मदत करण्याचं काम करत आहेत. पण काही जण ट्रोल करणारे जुने फोटो लावून बदनामी करत आहेत. दुष्काळातील सेल्फी बाबतीत तेच झालं होतं. मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरी संवेदना बाळगा अस त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 07:02 PM IST

ताज्या बातम्या