पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून 'मुर्दाबाद..मुर्दाबाद..संजय काकडे मुर्दाबाद'च्या घोषणा

पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून 'मुर्दाबाद..मुर्दाबाद..संजय काकडे मुर्दाबाद'च्या घोषणा

संजय काकडे यांनी त्यांच्या अव्कातीत रहावे, अशी संतप्त प्रतिक्रिया

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,13 डिसेंबर: भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे खासदार संजय काकडे यांचा भाजपकडून तीव्र निषेध करण्यात आला. 'संजय काकडेचं करायचं काय खाली मुंडके वर पाय.. मुर्दाबाद..मुर्दाबाद..संजय काकडे मुर्दाबाद'च्या घोषणा देत बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

दोन डगरीवर हात ठेवणारे संजय काकडे संधी साधू आहेत. त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो असी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिली आहे. संजय काकडे यांनी त्यांच्या अव्कातीत रहावे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपच्या महिला पदाधिकारी संगीता धसे यांनी दिली. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. गोपिनाथ मुंडे साहेबांनी संजय काकडे यांना मोठं केलं, याचं त्यांना भान राहिले नाही. ओळख साहेबांनी दिली ते संजय काकडेंनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली असती तरी त्यांना ओळखलं असतं. संजय काकडे कोणत्या पक्षाचे आहेत, हे आम्हाला माहिती आहे. रात्री एक आणि सकाळी एक अशी बोलायची सवय आहे. खासदारकीची उमेदवारी मागण्यासाठी दारोदारी फिरतात. अजित पवारांना भेटतात, ते संधी साधू आहेत.

संजय काकडेंनी आत्मपरीक्षण करावे. मुंडे साहेबांनी त्यांना मोठं केलं. परंतु ते आता मुंडे साहेबांना विसरले आहेत. संजय काकडे नी त्यांच्या अव्कातीत राहावं, अशा संतप्त प्रतिक्रिया भाजपच्या महिला पदाधिकारी संगीता धसे यांनी दिली.

..तर महाराष्ट्रात फिरुन काय दिवे लावणार

दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली. ते म्हणाले की, ज्यांना मतदारसंघ सांभाळता आला नाही, ते महाराष्ट्रात फिरुन काय दिवे लावणार, अशी टीका काकडे यांनी केली होती. पंकजा यांची विधाने भाजपच्या खऱ्या कार्यकर्त्याला दुखावणारी आहेत. पाच वर्षे तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्हाला काही काम करता आले नाही. मग महाराष्ट्रात फिरुन तुम्ही काय दिवे लावणार, असा सवाल काकडे यांनी विचारला आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी जातीपातीचे राजकारण केल्याने त्यांचा पराभव झाला. तर स्वतःच्या पराभवाचे खापर दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आरोप संजय काकडे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 08:51 PM IST

ताज्या बातम्या