पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य.. धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला मारले 'जोडे'

पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य.. धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला मारले 'जोडे'

पोलिसांना निवेदन देऊन केली धनंजय मुंडेंच्या अटकेची मागणी...

  • Share this:

विजय कमळे पाटील,(प्रतिनिधी)

जालना,20 ऑक्टोबर: परळीतील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. जालन्यातील घनसावंगीत रविवारी भाजप कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांचा निषेध करत आपला रोष व्यक्त केला.

भाजप कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंची प्रतिमा देखील जाळली. दरम्यान धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन देऊन धनंजय मुंडेंच्या अटकेची मागणी केली आहे.

तब्बल 20 तासांनी जनतेसमोर आल्या पंकजा मुंडे...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर परळीतील राजकारण तापले आहे. पंकजा मुंडे तब्बल 20 तासांनी जनतेसमोर आल्या. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेल्या. धनंजय मुंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर परळीत भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.

राजकारण सोडावसं वाटतंय- खासदार प्रितम मुंडे

खासदार प्रितम मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली. खासदार प्रितम मुंडे यांनी रविवारी दुपारी 'यशश्री' समोर जमलेल्या महिलांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, राजकारण सोडावसं वाटतंय, अशी भावना प्रितम मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी पंकजा मुंडेंही समोर आल्या होत्या. खासदार प्रितम यांनी सांगितले की, आम्ही खिन्न झालो आहोत. आता सगळं सहन करण्यापलिकडे गेलं आहे. सगळ्या गोष्टी राजकारणाच्या नसतात. आता धनंजयचे बोलणे ऐकवत नाही. गलिच्छ आणि घाणेरडे राजकारणाचा कंटाळा आला आहे. तुमचे-आमचं नातें निवडणुकीपुरते नाही, असे सांगताना खासदार प्रितम मुंडे यांना भावना अनावर झाल्या होत्या. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे असते, तर असे बोलण्याची कुणाची हिंमत झाली नसती. रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल, असेही प्रितम मुंडे यांनी यावेळी सांगितले.

ऐकवत नाही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन धनंजय त्यांच्याविषयी बोलले. अनेक दु:खे आली. खंबीरपणे त्याला सामोऱ्या गेल्या. त्या कधीही खचल्या नाही. काहीही केले तरी त्या खचत नाही हीच त्यांची पोटदुखी आहे. इतक्या खालच्या पातळीवरील टीका ऐकूनही त्या खचल्या नाहीत. मात्र, त्या उद्विग्न झाल्या आहे. मी त्यांना या आधी एवढे उद्विग्न झाल्याचे पाहिलेले नाही.

धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा

धनंजय मुंडे यांनी केज तालुक्यातील विड्याच्या भर सभेत पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपानंतर परळीत भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकाला घेराव घालत घोषणाबाजीही केली होती. दरम्यान, राज्य महिला आयोग धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध सुमोटो दाखल करणार आहे. तसेच ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असंही राज्य महिला आयोगानं म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून याबाबत स्पष्टीकरण दिले होते. यात त्यांनी म्हटलं की, शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली 'ती' क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेत 'ते' वक्तव्य केल्याचे धनंजय मुंडे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

'बहीण-भावाच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न', धनंजय मुंडे झाले भावुक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 05:14 PM IST

ताज्या बातम्या