लोकांच्या मनातली मी CM म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंनी केलं फडणवीसांचं तोंड भरून कौतुक म्हणाल्या...

'देवेंद्र तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही तीनदा नाही तर सतत तुम्हीच मुख्यमंत्री राहा. देवेंद्र फडणवीस माझ्या वडिलानंतर माझे गुरू आहेत.'

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 09:48 PM IST

लोकांच्या मनातली मी CM म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंनी केलं फडणवीसांचं तोंड भरून कौतुक म्हणाल्या...

सिद्धार्थ गोदाम, बीड 26 ऑगस्ट : मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं म्हणत अनेकदा वादात सापडणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज बीडमध्ये आली त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत पंकजाताईंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत ते आपल्या गुरुंच्या स्थानी असल्याचं सांगितलं तसच तुम्हीच कायम मुख्यमंत्री राहा अशा शुभेच्छाही व्यक्त केल्या. मला सहज सगळं मिळालेलं नाही. मेहनत करून मी इथपर्यंत आले असंही त्यांनी सांगितलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या, देवेंद्र तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही तीनदा नाही तर सतत तुम्हीच मुख्यमंत्री राहा. देवेंद्र फडणवीस माझ्या वडीलानंतर माझे गुरू आहेत. देवेंद्र आम्ही तुम्हाला अंगठा सुद्धा देऊ मात्र तो अर्जुनासाठी असावा. देवेंद्र चा नरेंद्र पर्यंतचा प्रवास सुखाचा होऊ दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना असल्याचंही त्या म्हणाल्या. मी बीड जिल्ह्याची आई आहे. मी तुमचा विकास करीन, तुमच्या अंगावर चांगले कपडे येतील याची मी काळजी घेईन.

राष्ट्रवादीला दणका: अजित पवारांसह 31 बँक संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल

मुख्यमंत्री काय म्हणाले?

Loading...

बीड जिल्हा हा गोपीनाथ मुंडे यांचा आज आहे आणि उद्याही राहील. मुंडे भगिनींनी गोपीनाथरावांचा वारसा चालवला. धनंजय मुंडेंनी माझ्याची चर्चा करण्याचं आव्हान दिलं, मला त्यांना सांगायचं आहे की माझ्या काय तुम्ही आधी आमच्या सुरेश धस यांच्याशी चर्चा करा. ईव्हीएम नाही तर ईव्हीएम वर आरोप करणारे यांचं डोकं खराब झालं आहे अशी टीकाही त्यांनी केली.

आरोप करणारे स्वत:चेच कपडे फाडून घेतील; पुन्हा पेटला काका पुतण्याचा वाद

शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवर मी समाधानी नाही म्हणून मराठवाड्यात कोकणातील पाणी बीड मध्ये आणायचं. दुष्काळ आता भूतकाळ करायचा आहे. बीड वॉटर ग्रीड साठी 5 हजार कोटी मंजूर केले अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 09:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...