लुच्चे लफंगे यांचं तोड परळीच्या महिलाच बंद करतील - पंकजा मुंडे

लुच्चे लफंगे यांचं तोड परळीच्या महिलाच बंद करतील - पंकजा मुंडे

'मला भविष्य घडवायचं गोठयातली गाय आणि घरातली माय सुखी रहावी यासाठी काम करेल.'

  • Share this:

सुरेश जाधव, पंकजा मुंडे, बीड 8 सप्टेंबर : लुच्चे लफंगे यांचं तोंड आत्ता परळीच्या महिलां भगिनीच बंद करतील अशी घणाघाती टीका करत  राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडें यांनी धनंजय मुंडेंवर निशाना साधला. परळी येथे आयोजित उमेद व पशू संवर्धन विभागाच्या वतीने बचत गटांच्या महिलांना दुधाळ गायीचे वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या या वेळी राज्याचे पशू संवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर  हे उपस्थित होते.

पंकजा मुंडे  म्हणाल्या, तुम्ही मला लक्ष्मी म्हणता मी तुम्हाला लक्ष्मी म्हणून नमन करते. लक्ष्मी ही स्वच्छ कारभार करणाऱ्यालाच आशीर्वाद देते.  तुम्हीं मला ताकत दिली तर तुम्हाला ताईच्या पाठिमागे रहावं लागेल.  भविष्यात मी सेवा करेल, भविष्य घडवायचं  गोठयातली गाय आणि घरातली माय सुखी रहावी यासाठी काम करेल असंही त्या म्हणाल्या.

मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

परळी मतदार संघात बचत गटाच्या माध्यमातून महिलांना 800 संकरीत गाई वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका सडकून टीका केली. त्या पुढे म्हणाल्या की,  निवडणुकीच्या आदल्या दिवशी घड्याळीवाल्यांनी तुमच्या नवऱ्यांना दारू मटण खाऊ घालून पाठवले तर तेव्हा तुम्ही काय कराल? आपल्या नवऱ्याना म्हणा की, भाकरी दुधात चुरुन न खाता दारूत चुरुन खा? व भाकरी सुध्दा स्वतःच बनवा? असं त्यांनी म्हणताच हशा पिकाला.

VIDEO:बाप्पाच्या कार्यक्रमाला महिलांची छमछम, अश्लील गाण्यावर अधिकाऱ्यांचा ठुमका!

विरोधक गेली 25 वर्षे काही न करता निवडून आलेच ना? पण मला काम करून तुमचे आशीर्वाद कमवायचे आहेत. काम नाही केले म्हणून गोपीनाथ मुंडे यांचे नाव खराब नाही करायचे असं असही म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 10:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading