पंकजा मुंडेंचा वाढदिवस; कार्यकर्त्याने मुलीचं नाव ठेवलं ‘पंकजा’, ताईंनी दिला आशीर्वाद

पंकजा मुंडेंचा वाढदिवस; कार्यकर्त्याने मुलीचं नाव ठेवलं ‘पंकजा’, ताईंनी दिला आशीर्वाद

कार्यकत्याचा उत्साह वाढवत त्यांनी त्या मुलीला आशीर्वाद दिला. वाढदिवसाच्या दिवशी कुणीही भेटायला येऊ नये असं आवाहनच त्यांनी केलं होतं.

  • Share this:

बीड 26 जुलै: भाजपच्या दिग्गज नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde Birth Day) यांचा आज वाढदिवस आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे (Corona and Lockdown) कुणीही भेटायला न येता आरोग्याची काळजी असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांचं जाळं मोठं आहे. ताईंचा वाढदिवस हा त्यांच्यासाठी मोठा दिवस असतो. ताईंच्या एका कार्यकर्त्याला आजच्या दिवशी कन्यारत्न झालं. मग काय, त्याने त्या चिमुकलीचं नाव ठेवलं ‘पंकजा’ आणि ताईंनीही तीला खास आशीर्वादही दिलेत.

केरबा पाटील हे पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहे. सरपंच असलेले केरबा पाटील यांना आज कन्यारत्न झालं. आपल्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांच्या वाढदिवशी कन्यारत्न झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. मग काय, त्यांनी आपल्या मुलीचं नाव ‘पंकजा’ असं ठेवलं. केरबा पाटील यांनी या चिमुकलीचा फोटो ट्विट करत पंकजाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पंकजा ताई यांनीही आपल्या कार्यकर्त्याच्या आनंदात सहभागी होत तिला आशीर्वादही दिलेत. शुभेच्छांसाठी धन्यवाद आणि छोट्या पंकजाला आशीर्वाद असं पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पंकजा मुंडेंनी घरीच आपला वाढदिवस साजरा केला.

या दिवशीची एक जुनी आठवणही त्यांनी ट्विटरवर शेअरकेली आहे. आपले वडिल गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. पंकजा ताईंच्या अगदी लहानपणीचा तो फोटो आहे. पंकजा ताई, गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या बहिणी असा तो फोटो असून गोपीनाथ मुंडे यांच्या चेहेऱ्यावर त्यांचं चिरपरिचित हास्यही आहे. तब्बल 4 हजारांपेक्षा जास्त लोकांनी तो फोटो लाईक केला आहे.

पंकजा मुंडे यांची भाजपच्या केंद्रीय कार्यकारी मंडळावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतच जाहीर केलं होतं. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर त्या नाराजही होत्या. नंतर त्यांच्याशी चर्चा करून नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न करत आला.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 26, 2020, 7:04 PM IST

ताज्या बातम्या