निवडणुकीनंतर पहिल्यांदाच धनंजय आणि पंकजा मुंडे समोरासमोर पण...

निवडणुकीनंतर पहिल्यांदाच धनंजय आणि पंकजा मुंडे समोरासमोर पण...

परळीतल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दोनही नेत्यांनी आपली सर्व शक्ती आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निकालाची चर्चा सर्व राज्यभर झाली होती.

  • Share this:

बीड 18 जानेवारी : परळी विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदाच आमने-सामने दिसून आले. निमित्त होतं संत वामनभाऊ यांच्या 44 व्या पुण्यतिथीचं. या निमित्त झालेल्या कार्यक्रमात हे दोघही नेते एकाच व्यासपीठावर समोरासमोर आले. गेली पाच वर्ष मंत्री म्हणून पंकजाताई गडावर येत होत्या. यावेळी धनंजय मुंडे हे मंत्री म्हणून आले होते. भगवान गडाच्या मेळाव्यावरून काही वर्षांपूर्वी मोठा वाद झाला होता. विधानसभा निवडणुकीत परळीतून धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंचा पराभव केला होता. प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या, वादही झाले होते. दोघांमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे दोनही नेते एकत्र आल्यानं सगळ्यांचं लक्ष त्याकडे लागलं होतं.

दोघांनीही आपल्या भाषणात नाव न घेता कोरखळ्या मारल्या. यावेळी खासदार प्रितम मुंडे याही उपस्थित होत्या. विधानसभा निवडणुकीत परळीतल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दोनही नेत्यांनी आपली सर्व शक्ती आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निकालाची चर्चा सर्व राज्यभर झाली होती. या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हे दोनही नेते एकत्र येत असल्याने सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

परीक्षेतला तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदी देणार विद्यार्थ्यांना टिप्स

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे वेगवेगळ्या वेळेला गडावर आले आणि दोघांनीही पूजा केली. व्यासपीठावर ते एकत्रच असले तरी अंतर राखून होते. दोघांमध्ये फक्त नजरा नजर झाली, मात्र ते एकमेकांना बोलले नाहीत. त्यांच्यात बातचित होते का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

एस.पी. कॉलेजमध्ये व्हॅलेन्टाईन, चॉकलेट डेच्या सेलिब्रेशनवर बंदी, हे आहे कारण?

निवडणुकीत आपल्या विरोधात धनंजय मुंडे यांना रसद पुरवढा करण्यात आला होता असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला होता. भाजपमधल्याच काही लोकांनी धनंजय मुंडे यांना मदत केली असे संकेतही त्यांनी दिले होते.

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2020 06:38 PM IST

ताज्या बातम्या