Osmanabad ZP Election : शिवसेनेच्या तानाजी सावंताची पक्षविरोधी भूमिका, भाजपशी केला घरोबा

Osmanabad ZP Election : शिवसेनेच्या तानाजी सावंताची पक्षविरोधी भूमिका, भाजपशी केला घरोबा

राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पक्षादेश झुगारत राणा पाटील प्रेमापोटी भाजपाला साथ दिली यामुळेही सत्ता स्थापन झाली पण या बंडखोर सदस्यांवर शिवसेना व राष्ट्रवादी काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  • Share this:

बालाजी निर्फळ, उस्मानाबाद 08 जानेवारी : राज्याचे लक्ष लागलेल्या उस्मानाबाद जिल्हापरषद अध्यक्ष व उपअध्यक्ष निवडीत शिवसेना उपनेते आ.तानाजी सावंत यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने शिवसेनेला धक्का बसलाय सावंत यांनी भाजपचे नेते आ. राणाजगजितसिंह पाटील व आ.सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा युतीचा झेंडा रोवलाय. राज्यात महविकास आघाडीचा बोलबाला असला तरी उस्मानाबाद जिल्हापरिषदेत नाट्यमय घडामोडी घडवत ही जिल्हा परिषद भाजपा शिवसेना यांनी ताब्यात घेतलीय.

राज्यात भाजपा शी फारकत घेत शिवसेनेने काँग्रेस राषट्रवादी सोबत घरोबा करत उद्धव ठाकरें नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले हाच फॉर्म्युला राज्यात सगळीकडे वापरत बीजेपीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे उपनेते आ. तानाजी सावंत यांनी आपले समर्थक सदस्य व पुतणे धनंजय सावंत यांना भाजपबरोबर पाठवून महाविकास आघाडीला धक्का दिलाय. तानाजी सावंत यांना मंत्रीपद न दिल्याने उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य नाराज होते व त्यांनी भाजपबरोबर जिल्ह्यात युती करण्याचा आग्रह धरला.

व त्याला होकार देत तानाजी सावंत यांनी आपला पुतण्या भाजपच्या मदतीने थेट उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवला. त्यात त्यांना उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची साथ मिळाली. आम्ही बंडखोरी केली नसून ज्ञानराज चौगुले, सुजितसिंह ठाकूर , राणाजगजितसिंह व तानाजी सावंत हे विकास करू शकतात या विकासालाच लक्ष ठेवून आम्ही युती केली असल्याचे धनंजय सावंत सांगत आहेत.

'भाजपचे राज ठाकरेंसोबत युतीचे संकेत, काँग्रेसचा मंत्रीच घडवेल राजकारणात भूकंप'

आतापर्यंत जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे 26 सदस्य व भाजपाचे 4 सदस्य घेऊन राणा पाटलांनी कारभार हाकला पण राणा पाटील यांचा भाजप प्रवेश झाला व जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली राष्ट्रवादीतील 26 पैकी 16 सदस्य हे राणा पाटील समर्थक आहेत याच्या जोरावर राणा पाटील यांनी ही जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले.

त्यांना तानाजी सावंत, सुजित ठाकूर ज्ञानराज चौगुले व अपक्ष व काँग्रेसचे तीन सदस्यांची साथ मिळाली त्यावरून त्यांनी आपल्या समर्थक राष्ट्रवादीच्या सदस्य अस्मिता कांबळे यांना अध्यक्षपदी बसवले आहे. अस्मिता कांबळे अध्यक्षपदी विराजमान झाल्या असल्या तरीही त्यांना आपला पक्ष नेमका कोणता अद्याप सांगता येत नाही.

Buldana ZP Election Result: निवडणुकीआधीच भाजपने सोडलं मैदान, आघाडीची बाजी

असं आहे उस्मानाबादचं संख्याबळ

जिल्हा परिषद एकूण सदस्य संख्या 54

राष्ट्रवादी 26

बीजेपी 4

शिवसेना 11

काँग्रेस 13

अपक्ष 1

अमित ठाकरेंच्या आधी आणखी एका दिग्गज नेत्याच्या मुलाची राजकारणात दमदार एन्ट्री

राणा पाटील समर्थक 16

शिवसेना तानाजी सावंत समर्थक 9

अपक्ष 1

भाजपा 4

एकूण 30 मतांनी दोन्ही उमेदवार विजियी

जिल्हा परिषदेचा आजचा निकाल ते भविष्यातील जिल्ह्याच्या बदलत्या राजकारणाची परिस्थिती सांगणार आहे. मंत्रिपद न दिल्याने तानाजी सावंत नाराज झाले. त्यांनी भाजपाला साथ दिली तर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पक्षादेश झुगारत राणा पाटील प्रेमापोटी भाजपाला साथ दिली यामुळेही सत्ता स्थापन झाली पण या बंडखोर सदस्यांवर शिवसेना व राष्ट्रवादी काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

Published by: Ajay Kautikwar
First published: January 8, 2020, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading