Elec-widget

कपाशीच्या उभ्या पिकांत गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

कपाशीच्या उभ्या पिकांत गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

नारायण सोळंके हे 21 नोव्हेंबर गुरुवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेले होते. मात्र, ते सायंकाळी घरी आलेच नाही

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,22 नोव्हेंबर: माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथे वयोवृद्ध शेतकरी नारायण अप्पाराव सोळंके (वय-65) यांनी कपाशीच्या उभ्या पिकांत गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही धक्कादायक घटना समोर आली.

निपाणी टाकळी शिवारात नारायण सोळंके यांची 10 एकर बागायती जमीन आहे. आपल्या कपाशीच्या शेतातच बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन नारायण सोळंके यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. नारायण सोळंके हे 21 नोव्हेंबर गुरुवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेले होते. मात्र, ते सायंकाळी घरी आलेच नाही. म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह शेतातील बाभळीच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. नारायण सोळंके यांनी आत्महत्या का केली, यामागील कारण समजू शकले नाही. सोळंके यांना दोन मुली व एक मुलगा असून तिघेही विवाहित आहेत.

चार एकर उभ्या कांद्याच्या पिकावर फिरवला रूटर...

दुसरीकडे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नावर परतीच्या पावसाने पाणी फिरवले. लाखो रूपये खर्च करून जोपासल्या कांद्याचा हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांद्याचे भाव कडाडले मात्र पावसाने वांदे केले. यात बीड तालुक्यातील अंधापूरी गावातील रामा टेकाळे या शेतकऱ्यांच्या चार एकर कांद्याला पाणी लागल्याने कांदा आतून सडला. यामुळे संतापलेल्या रामा टेकाळे यांनी कांद्याच्या उभ्या पिकांत ट्रक्टरने रूटर फिरवले. यांच्या डोळ्यांदेखत कांद्याची माती झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी थांबले नाही, अशीच परिस्थीती बीड जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. कांद्यावर खूप मोठे स्वप्न पाहिले होते. खर्चही केला पाण पावसाने अडचणीत सापडलो. काढणीला आलेल्या कांद्याला पाणी लागले. यामुळे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2019 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...