बीड, 31 जुलै : राज्यात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. अशात संपूर्ण आरोग्य व्यवस्था कामाला लागली आहे. अशात बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हेंटिलेटर बंद पडल्याने रुग्णांची तडफड सुरू आहे तर नातेवाईकांची ऑक्सिजन लावण्यासाठी धावपळ सुरू आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बीडच्या कोरोना कक्षात अचानक लाईट गेल्यामुळे रुग्णांची मोठी तारांबळ उडाली आगे. व्हेंटिलेटर बंद पडल्यामुळे रुग्ण अक्षरशः तडफडत असतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. बीडच्या शासकीय कोरोना कक्षातील ही विचलित करणारी दृश्य आहेत. यामुळे आरोग्य प्रशासनाचा आणि रुग्णालय विभागाचा भोंगळा कारभार समोर आला आहे. अशी परिस्थित जर एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतली तर त्याला कोण जबाबदार असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.
रक्ताच्या नात्येनं अंत्यसंस्काराला दिला नकार, सरपंचाने दिला माणूसकीचा आदर्श
रुग्ण तडफडत असताना काय करावं हे डॉक्टरांना देखील समजत नव्हतं, रूग्णाच्या नातेवाईकांनीच धावपळ करीत कक्षातीलच ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडीओ दोन दिवसंपूर्वीचा आहे. सदर रुग्ण गेवराई तालुक्यातील असून अखेर त्या रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णालयात गेली लाईट, व्हेंटिलेटर बंद झाला अन् तडफडू लागला रुग्ण.... pic.twitter.com/bN6ijH7bya
— News18Lokmat (@News18lokmat) July 31, 2020
कोरोनाच्या संकटात राज्यभर होणार तीव्र आंदोलन, 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार
रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना विजेची अद्यावत सोय करून ठेवणं हे गरजेचं होतं. परंतु असं झालं नाही त्यामुळे शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान याप्रकरणी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 738 वर पोहचलाय तर आतापर्यंत 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.