माता न तू वैरिणी! भैरवनाथाच्या सोनुबाई तीर्थकुंडात नवजात अर्भक फेकून माता पसार..

माता न तू वैरिणी! भैरवनाथाच्या सोनुबाई तीर्थकुंडात नवजात अर्भक फेकून माता पसार..

नवजात अर्भक पाण्याच्या कुंडात फेकून माता पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

बालाजी निरफळ,(प्रतिनिधी)

उस्मानाबाद, 14 सप्टेंबर: नवजात अर्भक पाण्याच्या कुंडात फेकून माता पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंडा तालुक्यातील सोनारी गावातील भैरवनाथ मंदिरासमोरील सोनुबाई तीर्थमध्ये एका निर्दयी मातेने आपले नवजात अर्भक फेकले. स्त्री जातीचे हे अर्भक असून ते पाण्यावर तरंगताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी महिलेचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात हा संतापजनक प्रकार घडला आहे. सोनारी इथे भैरवनाथाच्या मंदिराच्या समोरील सोनुबाई तीर्थकुंडात स्त्री जातीचे अर्भक फेकण्यात आले. शु्क्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. शनिवारी सकाळी गावातील लोक भैरवनाथाच्या दर्शनासाठी येत असताना या कुंडात नवजात अर्भक पाण्यावर तरंगत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मंदिर परिसरात बसवलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासून आरोपी महिलेचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या प्रकारामुळे सोनारी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नवजात अर्भक फेकले शेताच्या बांधावर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच घटना समोर आली होती. शिरूर तालुक्यातील काठापूर येथे रस्त्यांच्या कडेला स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले होते. गावकऱ्यांनी तत्काळ दवाखाण्यात दाखल केल्याने मुलीचे प्राण थोडक्यात बचावले. काठापुर-शिंगवे (पारगाव) रस्त्यांच्या कडेला शेताच्या बांधावर हे नुकतेच जन्मलेले हे अर्भक गुलाबी कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आले होते.

यशवंत केदारी व सुशिलाबाई झिंग्रे हे शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यांना हे अर्भक दिसले. त्यांनी याबाबत सरपंच बिपीन थिटे यांच्यासह विकास दाते, संभाजी लोंढे, पोलिस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून अर्भकाला टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी कृष्णा चव्हाण व सेविका मंगल मेचे घोडे यांनी मुलीची तपासणी केली.

बागायती भागातीस ही दुदैवी घटना आहे. टाकळी हाजी बेट भागासह काठापूर हे समृद्ध गाव आहे. या भागात मुलगी झाली म्हणून रस्त्यावर टाकून देण्याची घटना प्रथमच घडली आहे. हे अत्यंत दुर्देव असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता गावडे यांनी दिली होती.

SPECIAL REPORT: माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांच्या हाती बंदुकीऐवजी आता धनुष्यबाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2019 12:04 PM IST

ताज्या बातम्या