'दिल्लीत 56 इंचाची छाती आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना जनतेची भीती?'

'दिल्लीत 56 इंचाची छाती आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना जनतेची भीती?'

मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातील जनता आणि शेतकरी संतापला आहे. त्यांचा संयम सुटला तर महा जनादेश यात्रा सोडून रस्त्यावर पळावे लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

  • Share this:

बीड, 25 ऑगस्ट- मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातील जनता आणि शेतकरी संतापला आहे. त्यांचा संयम सुटला तर महा जनादेश यात्रा सोडून रस्त्यावर पळावे लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. दिल्लीत 56 इंचाची छाती आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना जनतेची भीती? असा खोचक सवालही खासदार कोल्हे यांनी माजलगाव येथे आलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत उपस्थित केला.

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय महाजनादेश यात्रा काढू नका. महाराष्ट्रातील जनता आणि शेतकरी संतापले आहेत. ज्याक्षणी त्यांचा संयम सुटेल, त्यावेळी महाजनादेश सोडून रस्त्यावर पळावे लागेल. तुमच्यावर ही परिस्थिती हा शेतकरी आणेल.

मुख्यमंत्र्यांच्या सभा आहेत, त्याठिकाणीच्या लोकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री पोलीसांच्या बळाचा वापर करत आहेत. धुळ्यात धर्मा पाटील यांच्या 69 वर्षीय पत्नीलाही दोन दिवसांपूर्वी स्थानबद्ध करण्यात आले होते. दिल्लीमध्ये 56 इंचाची छाती आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना जनतेची भीती, अशी शब्दात अमोल कोल्हे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी व्यासपीठावर विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे आ उपस्थिती होती.

धनंजय मुंडेनी पोलिसांना सुनावलं

शिवस्वराज्यच्या यात्रेमधील मावळ्यांना कोणाची भीती नाही. जनतेची भीती आम्हाला नाही ती भीती मुख्यमंत्र्यांना असेल. सभेला आलेल्या तरुणांना डी झोनमध्ये बसू द्या, अशा शद्बात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांना सुनावलं.

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आज, रविवारी माजलगाव येथे आली असता तरुणांची गर्दी झाली होती. मात्र, सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी स्टेजजवळ तरुणांना जाण्यास मज्जाव केला.

माजलगाव येथील सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात पोलिस सुरक्षेच्या कारणास्तव डी झोनमध्ये कार्यकर्त्यांना बसू दिले नाही. यावेळी कार्यकर्त्यांकडून पोलिसांबद्दल तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. हा प्रकार धनंजय मुंडे यांच्या लक्षात येताच तरुणांच्या जथ्याला थांबवत असलेल्या पोलिसांना समोर बोलावून चांगलेच खडसावले. कार्यकर्त्यांना डी झोन परिसरात बसू द्या, अशा सुचना दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सुरक्षेच्या कारणावरून प्रत्येक ठिकाणी नागरिकांना स्थानबद्ध केले जात आहे. कै. धर्मा पाटील यांच्या 69 वर्षीय पत्नीलाही स्थानबद्ध करण्यात आले. त्याचा संदर्भ घेत जनतेची भीती तुमच्या मुख्यमंत्र्यांना असेल, आम्हाला नाही. आम्ही जनतेतील नेते आहोत असे सुनावत सभेला येणाऱ्या एकाही माणसाला अडवू नका, अशा सूचना केल्या.

पृथ्वीचं फुफ्फुस अजूनही जळतंय; अ‍ॅमेझॉनमधल्या नैसर्गिक संपत्तीची राख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2019 03:42 PM IST

ताज्या बातम्या