Home /News /maharashtra /

... तर उदयन राजे यांनी पुरावे दिले पाहिजे, राष्ट्रवादीने केली राऊतांची पाठराखण

... तर उदयन राजे यांनी पुरावे दिले पाहिजे, राष्ट्रवादीने केली राऊतांची पाठराखण

'भाजपकडून काही मिळेल या आशेमुळे उदयनराजे भोसले लाचारी दाखावत आहेत.'

औरंगाबाद 17 जानेवारी : माजी खासदार उदयन राजेंना जर कोणी पुरावे मागत असतील तर त्यांनी ते दिले पाहिजे. तंगडी तोडण्याची भाषा कोणीही करू नये. अनेक राजघराण्यांमध्ये दत्तक घेतलेले राजे आहेत. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केलंय. त्याचबरोबर त्यांनी खासदार संजय राऊत यांची पाठराखणही केलीय. ते म्हणाले, जनतेने उदयन राजेंना पराभूत केले आहे. या पराभवातून ते अद्याप सावरलेले नाहीत. भाजपनेच महाराजांचा अपमान केला होता. भाजपच्या नेत्याने महाराजांची तुलना मोदींशी झाल्याने महाराजांची उंची वाढल्याचं वक्तव्य केलं. अश्या आमदारांना पाठीशी घालणे योग्य नाही. याला उदयन राजेंनी उत्तर दिले पाहिजे. मात्र भाजपकडून काही मिळेल या आशेमुळे राजे लाचारी दाखावत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपोषण सुरू केले आहे याबाबत बोलताना लाड यांनी काय काय केले हे त्यांना माहीत आहे. मी जास्त बोललो तर ते अडचणीत येतील. असा टोला नवाब मलिक यांनी लावला. इंदिरा गांधींच्या भेटीवरून वाद... जाणून घ्या, कोण होता मुंबईचा पहिला डॉन? उद्या सांगली बंद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी इस्लामपूरला एका कार्यक्रमासाठी येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात येत असताना शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष भिडे गुरूजी यांनी सांगली बंदचं आवाहन केलंय. शिवसेनेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी खासदार संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. भिडे गुरुजी म्हणाले, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही.

माझ्या निवृत्तीचा अनेकांचा प्लॅन होता पण..., शरद पवारांचा फडणवीसांना टोला

हे वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली. या विरोधात सर्व सांगली जिल्हा उद्या म्हणजे 17 जानेवारीला बंद राहणार आहे. संजय राऊतांनी माफी न मागितल्यास सर्व महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी तातडीन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. भिडे गुरुजी यांच्या या आवाहनानंतर हे आंदोलन आणखी चिघळणार अशी शक्यता आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊतांवर टीका केलीय. शिवसेनेला सत्तेचा अहंकार झाला असून त्या अहंकारातूनच हे वक्तव्य करण्यात आलंय. त्यांनी तातडीने यासाठी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही फडणवीस यांनी केलीय.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Nawab Malik

पुढील बातम्या