मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली, आमदार बिघडवू शकतो गणित

मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली, आमदार बिघडवू शकतो गणित

नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या निवडणुकीतही राष्ट्रवादीची गोची होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड, 31 डिसेंबर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सत्ताधारी पक्षांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादीचे माजलगाव मतदारसंघातील आमदार प्रकाश सोलंके हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पण प्रकाश सोलंके यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला एक आमदार तर गमवावा लागेलच, त्यासोबत नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या निवडणुकीतही राष्ट्रवादीची गोची होण्याची शक्यता आहे.

माजलगाव मतदारसंघातील प्रकाश सोलंके समर्थक पुण्यात आमदार प्रकाश सोलंके यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यामध्ये मतदारसंघातील स्थानिक नेते आणि जिल्हापरिषद सदस्य तसंच पंचायत समिती सभापतीचा यांचा समावेश आहे. या समर्थकांकडून आमदार सोलंके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती आहे.

शिवसेना-भाजपमधील वाद विकोपाला, आमदारानंतर खासदारावरही हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

प्रकाश सोलंके यांच्या राजीनामा नाट्याचे परिणाम बीड जिल्हापरिषद परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवर होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बीड जिल्हापरिषदेमध्ये आमदार सोलंके यांचा सर्वात मोठा 8 सदस्यांचा गट आहे. प्रकाश सोलंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यास त्यांचे समर्थक असलेले जिल्हापरिषद सदस्यदेखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर आमदार सोलंके यांची नाराजी राष्ट्रवादीसाठी अडचणीची ठरू शकते.

शिवसेनेच्या 5 माजी अनुभवी मंत्र्यांना उद्धव ठाकरेंनी दिला डच्चू

का वाढणार धनंजय मुंडेंची डोकेदुखी?

महाराष्ट्रात सगळ्यात चर्चेची आणि प्रतिष्ठेची बीड जिल्हा परिषदेची अध्यक्ष सभापती निवड येत्या 4 जानेवारीला होत आहे. यामुळे बीडचे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे सर्वाधिक जि.प सदस्य निवडून येऊन देखील पंकजा मुंडेनी राजकीय खेळी करत अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवत बाजी मारली होती. यात भाजपा, शिवसेना, शिवसंग्राम, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाच बंडखोर अशी राजकीय खिचडी करत सत्ता समीकरण जुळवले होते. पण विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेच्या पराभवानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत वर्चस्व मिळवण्यासाठी सध्या प्लान सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीने सरकार स्थापन करताच धनंजय मुंडेदेखील जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र आमदार प्रकाश सोलंके यांच्या नाराजीने जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीची गोची होऊ शकते. त्यामुळे धनंजय मुंडे या सगळ्यावर कसं उत्तर शोधतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 31, 2019, 9:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading