धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर परळीतून भावनिक प्रतिक्रिया

परळीत धनंजय मुंडे समर्थकांनी आनंद साजरा केला आहे. तसंच काही भावुक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड, 30 डिसेंबर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघामध्ये हायव्होल्टेज लढत झाली. या लढतीत धनंजय मुंडे यांनी मोठा विजय मिळवला. त्यानंतर आता त्यांना मंत्रिपदही मिळालं. त्यामुळे परळीत धनंजय मुंडे समर्थकांनी आनंद साजरा केला आहे. तसंच काही भावुक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

'परळीत आज खरी दिवाळी साजरी होतं आहे. आनंदाने ऊर भरून आला. खंत येवढीच आहे की स्व.पंडित अण्णा म्हणायचे की माझ्या मुलांना गुलाल लागेल की नाही. पण आज पहिल्यांदा धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री झाले. हे पाहायला पंडित अण्णा हवे होते. खऱ्या अर्थाने धनंजय मुंडे यांच्या संघर्षाच्या प्रवासात आम्ही सोबत होतोच. त्याचा आज आनंद आणि अभिमान वाटतोय,' अशा भावना परळीतील धनंजय मुंडे समर्थकांनी व्यक्त केल्या आहेत.

...म्हणून संजय राऊत यांनी मारली ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्याला दांडी!

धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बीड जिल्ह्यात फटाके वाजवून आतषबाजी करण्यात आली. परळी येथील धनंजय मुंडे यांच्या जगमित्र निवास्थानी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. तर बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटक्याची अतेषबाजी करतात जल्लोष केला.

शपथविधीआधी काँग्रेस-राष्ट्रवादीतील असंतोष उफाळला, समर्थकांच्या राजीनामा सत्रास सुरुवात

दरम्यान,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राज्याच्या उप-मुख्यमंत्रिपदाची तर परळीचे आमदार धनंजय मुंडे, कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तिन्ही पक्षांचे एकूण 36 मंत्री शपथ घेणार आहेत. तिन्ही पक्षांनी आपापसांत कोणती खाती वाटून घ्यायची हे निश्चित केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2019 03:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading