...तर महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनते समोर फाशी घेईन - धनंजय मुंडे

'राज्यातल्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याचे पुरावे दिले. हजारो कोटींचे आरोप करूनही सगळ्या मंत्र्यांना क्लिन चीट दिली गेली. कुठलीही चौकशी केली गेली नाही.'

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 06:45 PM IST

...तर महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनते समोर फाशी घेईन - धनंजय मुंडे

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद 20 सप्टेंबर : महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना फैलावर घ्यायला सुरुवात केलीय. जे नेते पक्ष सोडून गेले त्यांच्याच गावात जावून पवार कार्यकर्त्यांना भेटत आहे. 15-20 वर्ष जे पवारांसोबत होते असं निष्ठावान समजले जाणारे अनेक नेते भाजप किंवा शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला प्रचंड मोठं खिंडार पडलंय. ही पडझड रोखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी शरद पवार राज्यांच्या झंझावती दौऱ्यावर आहेत. आज औरंगाबदमध्ये झालेल्या सभेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पवारांच्या समोर राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला.

धनंजय मुंडे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात की आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. पण मी राज्यातल्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याचे पुरावे दिले. हजारो कोटींचे आरोप करूनही सगळ्या मंत्र्यांना क्लिन चीट दिली गेली. कुठलीही चौकशी केली गेली नाही. माझे आरोप खोटे निघाले तर महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेसमोर मी फाशी घेईन असं आव्हानही त्यांनी सरकारला दिलं.

वाचा - 'शरद पवार हेच आमचे अमिताभ बच्चन'

ते पुढे म्हणाले, पवार साहेबांचं पाऊल मराठवाड्यात पडलं आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचं आगमन झालं. नियतीचा हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात जेवढी विमानताळ पवारांनी बांधली तेवढे यांना गुजरात मध्ये बस स्टँड बांधता आले नाहीत. पुरोगामी महाराष्ट्रात शरद पवारांना कुणीही संपवू शकत नाही. राजे गेले सेनापती गेले सरदार गेले. मात्र मावळे मात्र पवारांसोबत आहेत. छत्रपतींच्या घरात फूट पडण्याचा प्रयत्न करणारे अण्णाजी पंत होते. आज त्याच अण्णाजी पंतांना छत्रपतींचे वंशज शरण गेले. छत्रपतींचा भाजप प्रवेश तडीपार जेल मध्ये गेलेल्या व्यक्ती कडून झाला.

पक्ष सोडणाऱ्यांना घरी पाठवणार

Loading...

कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, पक्ष बदलणारे म्हणताय विकास करायचा म्हणून तिकडे चाललो, मग 15-15 वर्ष मंत्रिपद असून काय केलं. विकासाच्या नावावर पक्ष सोडणाऱ्यांनो थोडे दिवस थांबा, तुम्ही आणि मी आहोत. फक्त बटन दाबायची वेळ येऊ द्या, मग यांचा विकास कुठे पाठवायचा ते आपण ठरवू. पक्ष सोडणाऱ्यांना आता घरी पाठविण्याची वेळ आलीय.  कुठे पळापळ झाली तरी जालन्यातील राष्ट्रवादीचा कोणीही कुठे जाणार नाही याचा मला विश्वास आहे. असं त्यांनी सांगितलं.

वाचा - विधानसभा निवडणुकीत काँग्रेस लातूरचा बालेकिल्ला राखणार? पाहा SPECIAL REPORT

जाताना नेते म्हणतात पवार माझ्या ह्रदयात आहेत. मी जर तुमच्या ह्रदयात आहो तर मग पक्ष का सोडून जात आहात असा सवाल त्यांनी केला. पवार यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, शहा उद्योगपतींचं कर्ज माफ करताहेत पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही अशी त्यांची भूमिका आहे. ज्या शेतकऱ्यांच्या भरवशावर अन्न-पाणी मिळते त्याच शेतकऱ्यांना हे लोक विसरतात. तुम्ही आम्ही एकदा ठरवलं तर भाजपला सत्तेवरून हाकलायला वेळ लागणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 06:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...