राष्ट्रवादीच्या या आमदाराचा राजीनामा घेण्यासाठी चक्क मोटारसायकलवर आले विधानसभा अध्यक्ष

राष्ट्रवादीच्या या आमदाराचा राजीनामा घेण्यासाठी चक्क मोटारसायकलवर आले विधानसभा अध्यक्ष

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे विधानसभा सदस्याचा राजीनामा देण्यासाठी शुक्रवारी सकाळी औरंगाबादला पोहोचले.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,(प्रतिनिधी)

औरंगाबाद, 13 सप्टेंबर: राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे विधानसभा सदस्याचा राजीनामा देण्यासाठी शुक्रवारी सकाळी औरंगाबादला पोहोचले. त्यांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे चक्क चक्क मोटारसायकलवर आल्याचे पाहायला मिळाले. भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्षांकडे सुपर्द केला. विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्षांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा हातोहात मंजुरही केला.

दरम्यान, भास्कर जाधव आज 2 वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: भास्कर जाधव यांना शिवबंधन बांधणार आहेत. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

चक्क मोटारसायकलवर आले विधानसभा अध्यक्ष...

झाले असे की, कुंभेफळ जवळील रेल्वे क्रॉसिंगवर फाटक पडल्याने उशीर होत होता. भास्कर जाधव वाट पाहत असल्याने हरिभाऊ बागडे यांनी पायी चालत जाऊन रेल्वे रुळ ओलांडले. एका मोटारसायकलस्वाराला त्यांनी हात दिला. चक्क हरिभाऊ मोटारसायकलवर बसून कुंभेफळला पोहोचले आणि तिथे त्यांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा स्विकारला. भास्कर जाधव यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब विशेष विमानाने औरंगाबादला आले होते. आता ते परत त्याच विमानाने मुंबईला निघाले आहे.

इथं बोलू नका...जे काय बोलायचं ते मुंबईला!

इथं बोलू नका...जे काय बोलायचं ते मुंबईमध्ये बोलू, असे मिलिंद नार्वेकर यांनी मीडियाला सांगितले. माझा पुढचा राजकीय प्रवास आता उद्धव ठाकरे हेच ठरवतील, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी केली खास विमान व्यवस्था...

भास्कर जाधव आपला राजीनामा सचिवांकडे देऊन तो विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना फॅक्सने पाठवून त्यांची स्वाक्षरी घेता आली असती. परंतु यात खूप वेळ जाईल, म्हणून स्वत: उद्धव ठाकरे यांनी आपल्यासाठी खास विमानाची व्यवस्ठा केल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले आहे.

साताऱ्यात राष्ट्रवादीला दुहेरी धक्का, रामराजेंचा शिवसेना प्रवेश निश्चित?

दुसरीकडे, साताऱ्यात राष्ट्रवादीला दुहेरी धक्का बसला आहे. साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीला साताऱ्यात आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादी सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती आहे.

रामराजेंच्या उपस्थितीत आज त्यांच्या कार्यकर्त्यांच्या एक मेळावा होणार आहे. या मेळाव्यातच ते आपल्या शिवसेना प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते अशी ओळख असलेले रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादीत सोडत असल्याने पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे.

राष्ट्रवादी सोडण्याचं नेमकं कारण कोणतं?

साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र या संघर्षानं टोक गाठल्याचं दिसत आहे. दोन्ही राजेंनी काही दिवसांपूर्वी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली. याच संघर्षामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला होता. मात्र आता एकाचवेळी दोन्ही राजे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या गोटात दाखल होत असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी सोडण्यामागे नक्की आपआपसातील संघर्ष कारणीभूत आहे की वेगळेच काही कारण आहे, याबाबत आता चर्चा रंगत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र शरद पवारांच्या या प्रयत्नांना विशेष यश आलं नाही. कारण या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पवारांनी घेतलेल्या बैठकीनंतर रामराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांवर टीकेचे आसूड ओढले होते.

मुख्यमंत्री फडणवीस लेकीसोबत पोहोचले गिरगाव चौपाटीवर VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: September 13, 2019, 10:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading