मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मी गोपीनाथ मुंडे यांच्या पोटाला जन्माला आलो नसेल, पण...' धनंजय मुंडेंचं भावुक वक्तव्य

'मी गोपीनाथ मुंडे यांच्या पोटाला जन्माला आलो नसेल, पण...' धनंजय मुंडेंचं भावुक वक्तव्य

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एक भावनिक वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एक भावनिक वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एक भावनिक वक्तव्य केलं आहे.

बीड, 10 जानेवारी : 'स्व.गोपीनाथ मुंडेच्या कल्याणकारी विचार घेवून पुढे जात आहे. मग वारस म्हणा किंवा कार्यकर्ता. भलेही मी त्या व्यक्तीच्या पोटाला जन्माला आलो नाही. पण म्हणून मी गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचा वारस होणं गैर आहे का? मला गद्दार, बेईमान, खलनायक ठरवले गेले. भगवान गडावर दर्शनासाठी गेल्यानंतर माझ्या ताफ्यावर दगडफेक झाली, मात्र उशिरा का होईना सत्याचा विजय होत असतो, नियती सत्याच्या मागे उभी राहत असते,' असं भावुक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. 'भगवानबाबा एक ना एक दिवस न्याय करतील असा मला पाहिल्या दिवसापासून विश्वास होता आणि भगवानबाबांनी न्याय केला,' या शब्दांत धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंत्री धनंजय मुंडे यांचा आज परळीत नागरी सत्कार होत आहे. त्या अगोदर त्यांनी बीड शहरात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपला पुन्हा धक्का, मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला 'सत्याचा विजय होतच असतो, उशीर लागतो, मात्र विजय होतो. 2012 मध्ये जो निर्णय घ्यावा लागला होता, तो निर्णय घेतलेला नव्हता, तर माझ्यावर लादलेला होता. गोपीनाथराव मुंडेंनी भगवानगडावरून नाते तोडण्याची घोषणा केल्यानंतर आमच्यासमोर पर्याय नव्हता. नंतरची 5-7 वर्ष मला गद्दार, बेईमान, खलनायक ठरवले गेले. मात्र ते सहन करत मी काम केले. त्यामुळेच आजचा दिवस पाहायला मिळत आहे. सत्याच्या पाठीशी नियती उभी राहिली आहे. भगवानबाबांनी न्याय केला आहे ' असे धनंजय मुंडे म्हणाले. गोपीनाथ मुंडेंच्या इतिहासाची पुनरावृत्ती 'गोपीनाथराव मुंडे विरोधी पक्षनेते असताना भगवानगडावर गेले होते. त्यावेळी त्यांच्याही ताफ्यावर दगडफेक झाली होती. मात्र नंतर त्याच गडाने गोपीनाथ मुंडेंना सन्मान दिला, शक्ती दिली. माझ्याही बाबतीत तेच झाले. ज्या गडावर माझ्या ताफ्यावर दगडफेक झाली, तिथेच मला शक्ती मिळाली आहे. मी कोणत्याच गडावर राजकारण करत नाही. गडांचा राजकीय प्रभाव मला मान्य आहे. मात्र हे सारे अध्यात्मिक गड मी श्रद्धास्थळ , शक्तिस्थळ मानतो आणि मी या गडांचा भक्त आहे ' असे धनंजय मुंडे म्हणाले. 'परळीच्या जनतेनं मला निवडून दिले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले. त्यांचे म्हणणे होते आता परळीत येताना काही तरी जबाबदारी घेवून परळीला या. त्यामुळे नागरी सत्कार आयोजित केला आहे. परळीची जनता स्वागताला उत्सुक आहे. खरे तर हे श्रेय परळी व बीडच्या जनतेचं आणि पवार साहेबांनी दिलेल्या जबाबदारीचे आहे. जसे स्वागताची उत्सुकता आहे. उत्कंठा आहे. तशीच जनतेची माझ्याकडून मोठी अपेक्षाही आहे. निवडणुकीपूर्वी जिल्हावासीयांना दिलेला शब्द पाच वर्षात पूर्ण करायचे आहे. बीडच्या जनतेचं उत्पन्न वाढवणे हे माझ्या पुढील काळातील उद्दिष्ट असेल,' असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपला पुढील अजेंडा स्पष्ट केला. खात्याबद्दल स्पष्टीकरण 'मी विधानसभेला पडूनही पवार साहेबांनी मला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले. त्यामुळे सामाजिक न्याय हा विभाग कमी प्रतिष्टेचा आहे, असा गैरसमज चुकीचा आहे. सामान्य दीन-दलित, आदिवासी समाजाला मदत हे खाते चांगल्या प्रकारे करू शकते,' असं धनंजय मुंडे म्हणाले.
First published:

पुढील बातम्या