Home /News /maharashtra /

भररस्त्यात आढळला राजकीय कार्यकर्त्याचा जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ

भररस्त्यात आढळला राजकीय कार्यकर्त्याचा जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ

राजकीय कार्यकर्त्याचा मृतदेह भररस्त्यात जळालेल्या अवस्थेत आढळला आहे.

    मुजीब शेख, नांदेड, 5 सप्टेंबर : नांदेडमध्ये आज एका राजकीय कार्यकर्त्याचा मृतदेह भररस्त्यात जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. दयानंद वंजे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. नांदेड शहरातील मालेगाव रोडवर वंजेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सुरू केला आहे. दयानंद वंजे यांच्या मृत्यूप्रकरणी मोठे षड्यंत्र असल्याची चर्चा असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. मयत वंजे यांची सर्वच पक्षातील राजकीय व्यक्तीसोबत उठबस असायची. त्यातून त्यांनी मोठ्या आर्थिक उलाढाली केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दयानंद वंजे यांच्या मृत्यूमागे नेमके कोणते कारण आहे, या उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. याप्रकरणी पोलीस सध्या काहीही सांगायला तयार नसून माध्यमांना तपासाअंती माहिती दिली जाईल असे कळवण्यात आलं आहे. त्यामुळे वंजे यांच्या मृत्यूचे गूढ वाढले असून शहरात चर्चाना उधाण आलं आहे. हेही - जालन्यात भरदिवसा थरार, हाणामारीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू तर तिसरा गंभीर दरम्यान, एका वजनदार राजकीय कार्यकर्त्याचा भररस्त्यात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणामुळे शहरातील कायदा-व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दुसरीकडे वंजे यांच्या मृत्यूला कोण कारणीभूत आहे, हे शोधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Nanded

    पुढील बातम्या