मुलगी हवी म्हणून नांदेडात महिलेनं बाळ चोरलं !

मुलगी हवी म्हणून नांदेडात महिलेनं बाळ चोरलं !

मुलाच्या हव्यासापायी मुलींचे जीव घेतले जाणं आपल्यासाठी नवं नाहीय. पण मुलगी हवी म्हणून दोन मुलांच्या आईनं चक्क एका 1 दिवसाच्या चिमुकल्या मुलीला पळवलं. नांदेड शहरातल्या वाडेकर रुग्णालयात हा प्रकार घडलाय.

  • Share this:

नांदेड, 14 ऑक्टोबर : मुलाच्या हव्यासापायी मुलींचे जीव घेतले जाणं आपल्यासाठी नवं नाहीय. पण मुलगी हवी म्हणून दोन मुलांच्या आईनं चक्क एका 1 दिवसाच्या चिमुकल्या मुलीला पळवलं. नांदेड शहरातल्या वाडेकर रुग्णालयात हा प्रकार घडलाय. रुग्णालयातून बाळ चोरणाऱ्या या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. शिल्पा भंडारे या महिलेची सरकारी रुग्णालयात प्रसुती झाली. मुलीला लस द्यायचा बहाणा करुन सीमा पंडीत महिलेनं बाळ घेऊन पळ काढला. पण बाळ चोरणारी सिमा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली.

सिडको भागात राहणा-या सिमा पंडीत नावाच्या महिलेकडे 2-3 दिवसांचे बाळ असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाली. त्यानंतर तिचं बिंग फुटलं. बाळ चोरणारी सिमा पंडीत ही महिला घटस्फोटीत असून तिला 2 मुलं आहेत. मुलीच्या हव्यासापोटी तिनं हे कृत्यं केल्याचं पोलीस उपनिरीक्षक किरण पाठोडे यांनी सांगितलं.

First published: October 14, 2017, 7:11 PM IST

ताज्या बातम्या