मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपूरमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या हत्येचा प्रयत्न; भर रस्त्यात अंगावर घातली गाडी, VIDEO समोर

नागपूरमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या हत्येचा प्रयत्न; भर रस्त्यात अंगावर घातली गाडी, VIDEO समोर

हेड कॉन्स्टेबल सुभाष लांडे यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हेड कॉन्स्टेबल सुभाष लांडे यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हेड कॉन्स्टेबल सुभाष लांडे यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नागपूर, 29 फेब्रुवारी : नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील हेड कॉन्स्टेबल सुभाष लांडे यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या अंगावर आरोपीने सवारी व्हॅन वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने ते थोडक्यात बचावले. भर रस्त्यात झालेल्या या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल सुभाष लांडे यांच्या पायाला सहा टाके लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी आरोपीवर अवैध प्रवासी वाहतूक करण्याच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी आरोपीनं हेड कॉन्स्टेबल सुभाष लांडे यांना बघून घेण्याची धमकी दिली होती. कारवाईचा राग मनात धरून आरोपीनं हेड कॉन्स्टेबल लांडे यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोनपैकी एका आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'शंभर टक्के पोलिसांचा वचक महाराष्ट्रामध्ये आहे. मात्र अशी जर एखादी घटना झाली असेल तर आम्ही माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करू,' असं अनिल देशमुख म्हणाले. जामखेडमध्ये आठवडी बाजारातच गोळीबार, लोकांमध्ये भीतीचं वातावरण दरम्यान, नागपूरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. खून, दरोडा, मारहाण असे प्रकार सातत्याने घडत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचं चित्र आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आगामी काळात गृहखातं नेमकी काय पाऊलं उचलतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First published:

Tags: Nagpur, Nagpur crime

पुढील बातम्या