परळीत प्रेमप्रकरणातून हत्या.. अल्पवयीन भावांनी बहिणीच्या प्रियकराला संपवले

परळीत प्रेमप्रकरणातून हत्या.. अल्पवयीन भावांनी बहिणीच्या प्रियकराला संपवले

परळीत प्रेमप्रकरणातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बहिणीच्या प्रियकरावर दोन अल्पवयीन भावांनी ब्लेडने सपासप वार केले.

  • Share this:

बीड,3 सप्टेंबर: परळीत प्रेमप्रकरणातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बहिणीच्या प्रियकरावर दोन अल्पवयीन भावांनी ब्लेडने सपासप वार केले. पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोन्ही अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी (2 सप्टेंबर) झालेल्या या हत्याकांडामुळे संपूर्ण परळी शहर हादरले आहे.

मिळालेली माहिती अशी की, अनिल हालगे (वय-22,रा.गणेशपार) या युवकाचा मृतदेह पोलीस स्टेशनजवळील कब्रस्तानमध्ये सोमवारी सकाळी आढळून आला होता. तरुणाच्या शरीरावर तिक्ष शस्त्राने वार केल्याचे पोलीस तपासात आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

प्रेमप्रकरणातून हत्या...

आरोपींच्या बहिणीचे अनिलसोबत प्रेमसंबंध होते. याच रागातूनच आरोपीने अनिलवर ब्लेडने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. अनिलच्या संपूर्ण शरीरावर वार करण्यात आले आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हत्येत वापरलेले दगड, ब्लेड आणि तुकडे केलेला मृत अनिलचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षणासाठी लातूरमध्ये आलेला विद्यार्थी दोन वर्षांपासून बेपत्ता

शिक्षणाचा लातूर पॅटर्न महाराष्ट्रात गाजला होता. याच शिक्षणासाठी बीडमध्ये मोठी स्वप्न घेऊन लातूरमध्ये आलेला एक विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता आहे. त्याच्या शोधासाठी त्याचं कुटुंबीय तर वणवण फिरत आहे. मात्र पोलीस आणि CIDलाही त्याचा काही ठाव ठिकाना लागत नाहीये. आपला हुशार असलेला मुलगा अचानक बेपत्ता झाल्यानं त्याच्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकलाय. पण त्याची वाट पाहण्याशीवाय त्यांच्या हातात आता कहीच नाहीये. त्यामुळच पोलिसांनीही आता मदतीचं आवाहन केलंय.

मकरध्वज उर्फ अक्षय देवकते असं बेपत्ता झालेल्या मुलाचं नाव आहे. अक्षयला बारावीत 83 टक्के गुण मिळाले होते. घरची परिस्थिती सामान्य. वडील शेतकरी. मात्र आपल्या गुणी मुलासाठी त्यांनी पै पै जमवून त्याला पुढच्या शिक्षणासाठी लातूरला पाठवलं. 2015 मध्ये बीड जिल्ह्यातल्या ढेकणमोहा या गावातून अक्षय दहावी झाला. त्यानंतर त्याने अकरावी सायन्सला लातूरच्या दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावीत त्याला 83 टक्के गुण मिळाले. नंतर त्याने नेट परीक्षेच्या तयारीसाठी शाहू कॉलेजात प्रवेश घेतला.

लातूर शहरातल्या माताजी नगरमध्ये तो भाड्याने राहत होता. 27 मार्च 2017 रोजी तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी शोध घेऊनही न सापडल्याने विवेकानंद पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या पालकांनी तक्रार दाख केली. तब्बल तीन PSI आणि एक ASIच्या टीमने त्याचा बराच शोध घेतला. मित्र आणि इतरांच्या अशा 19 जणांची चौकशी केली आणि जबाब घेतली. मात्र पोलिसांना यश आलं नाही.

TikTokसाठी काही पण! तरुणानं VIDEO शूट करण्यासाठी जीप दिली पेटवून

Published by: Sandip Parolekar
First published: September 3, 2019, 12:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading