बाळंतपणाला आलेल्या बहिणीच्या 13 दिवसांच्या लेकीला भावानेच संपवलं, कारण पाहून पोलीसही झाले हैराण

बाळंतपणाला आलेल्या बहिणीच्या 13 दिवसांच्या लेकीला भावानेच संपवलं, कारण पाहून पोलीसही झाले हैराण

मामाने 13 दिवसाच्या भाचीचा खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

लातूर, 31 ऑगस्ट : लॉकडाऊनच्या दरम्यान गुन्ह्यांच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार लातूरमध्ये समोर आला आहे. मामाने 13 दिवसाच्या भाचीचा खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिमुकली मुलगी सतत रडत असल्याने चीड येऊन मामानेच जीव घेतला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

राज्यात पुढचे 24 तास हलका व मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक इथली ही हृदयद्रावक घटना आहे. पोलिसांनी 24 तासानंतर हत्येचा शोध लावला आहे. या खून प्रकरणी मामाविरूध्द चाकूर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलं असून कृष्णा अंकूश शिंदे असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपील अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आरोपी मामा कृष्णाने 13 दिवसांच्या गोंडस चिमुकलीला पाण्याच्या बँरेलमध्ये टाकून तिचा खून केला. झरी बुद्रूक इथली एक महिला बाळंतपणासाठी झरी इथे माहेरी आली होती. 13 दिवसांपूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. शनिवारी सकाळी अचानक घरातून ही मुलगी गायब झाली. यामुळे घरातील व्यक्तींनी मुलीचा शोध घेतला. परंतू ती कुठेही आढळून आली नाही.

'मंदिरं उघडण्यासाठी भाजपने केलेलं आंदोलन नक्की धार्मिक होतं की राजकीय?'

काही वेळानंतर घरातील पाण्याच्या टाकीत सदर मुलीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासात चिमुकलीचा मामा कृष्णा अंकूश शिंदे वय 19 याने ती चिमुकली सतत रडत असल्याने चीड येऊन चिमुकलीला पाण्याच्या बँरेलमध्ये टाकून खून केल्याचे समोर आलं. याप्रकरणी 24 तासानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 31, 2020, 8:49 AM IST

ताज्या बातम्या